Pune Crime News | ‘पठाण’चे पोस्टर फाडणार्‍या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | राहुल चित्रपटगृहाच्या (Rahul Cinema, Pune) आवारात शिरुन तेथील ‘पठाण’ चित्रपटाची बॅनर (Pathan Movie Banner) फाडून घोषणाबाजी करणार्‍या बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

बजरंग दलाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहसचिव नितीन महाजन व त्यांच्या १५ ते १९ कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिसांनी (Shivajinagar Police Station) गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस शिपाई अंकुश कोल्हे यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार राहुल चित्रपटगृहात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडला होता.

पठाण चित्रपटातील एका गाण्यात दीपिका पादुकोन हिने भगवी वस्त्रे घालून अश्लिल नृत्य केल्याने
हिंदुत्ववादी संघटना खवळल्या असून त्यांनी या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.
पठाण चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याचे पोस्टर राहुल चित्रपटगृहात लावण्यात आले होते.
हे समजल्यावर बजरंग दलाचे काही कार्यकर्ते तेथे जमले व त्यांनी पोस्टर फाडून शाहरुख खान विरोधात
घोषणाबाजी केली. त्यामुळे गुन्हा दाखल केला आहे.

Web Title :-  Pune Crime News | A case has been registered against Bajrang Dal activists who tore down the poster of ‘Pathan’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ratnagiri Crime | दुर्दैवी! दुचाकीवरून पडून महिला शिक्षिकेचा मृत्यू

Pune Crime News | कल्याणीनगरमध्ये व्यावसायिकाने केला शेकोटी करणाऱ्यांवर गोळीबार; ‘‘भैय्या कहा के हो’’ विचारल्याने रागात केला गोळीबार, तरुणांनी फोडली कार

Satara Crime News | सातार्‍यात व्यावसायिकाची ६ गोळ्या झाडून हत्या

MNS Chief Raj Thackeray | मराठी माणसासाठी बाळासाहेबांनी सत्तेला लाथ मारली, राज ठाकरेंनी दिला बाळासाहेबांच्या आठणवणींना उजाळा