Pune Crime News | महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात तोडफोड प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Bharatratna Atalbihari Vajpayee Medical College & Hospital, Pune) अधिष्ठात्यांना प्रवेशासाठी दहा लाखांची लाच (Pune Bribe Case) घेताना अटक झाल्यानंतर तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे – MNS) कार्यकर्त्यांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला. मंगळवार पेठेतील पारगे चौकात असलेल्या महाविद्यालयाच्या आवारात मनसेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी १२ वाजता आंदोलन केले होते. (Pune Crime News)

याप्रकरणी मनसेचे आशिष साबळे, प्रशांत कनोजिया, धनंजय गवळी यांच्यासह सहा ते सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वैद्यकीय महाविद्यालयातील (Pune PMC Medical College) वरिष्ठ तांत्रिक भाऊसाहेब माने यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद (गु. रजि. नं.१४३/२३) दिली आहे. (Pune Crime News)

वैद्यकीय शाखेत प्रवेश देण्यासाठी दहा लाख रुपये लाच घेताना अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचा
अधिष्ठाता डॉ. आशिष श्रीनाथ बंगिनवार Dr Ashish Shrinath Banginwar ( वय ५४) यांना
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune (ACB Pune) मंगळवारी सायंकाळी अटक केली. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते बुधवारी दुपारी वैद्यकीय रुग्णालयाच्या आवारात जमले. कार्यकर्त्यांनी अधिष्ठाता डॉ. बंगिनवार यांच्या निषेधार्थ घोषणा देऊन कक्षाची तोडफोड केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यालयातील तीन संगणक, दोन खुर्च्यांची तोडफोड केली होती. त्यानंतर याबाबत मनसेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक माने (PSI Mane) तपास करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

10 August Rashifal : मेष, मिथुन आणि कुंभ राशीवाल्यांची आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे संकेत, वाचा दैनिक राशिफळ