Pune Crime News | 22 लाखाच्या फसवणूक प्रकरणी नितीन गोते, रोहित गोते, तुषार खेडेकर, राहुल मोरबाळे, मिथुन हारगुडे विरूध्द गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | जमीन खरेदीखत करून ताबा देतो असे सांगुन 22 लाख 11 हजार 600 रूपये घेवुन जमीनीचा ताबा न देता आर्थिक फसवणूक (Cheating Case) केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात (Lonikand Police Station) 5 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

नितीन गोते (Nitin Gote), रोहित गोरक्ष गोते (Rohit Goraksh Gote), तुषार खेडेकर (Tushar Khedekar), राहुल मोरबाळे (Rahul Morbale) आणि मिथुन हारगुडे (Mithun Hargude) यांच्याविरूध्द भादंवि 406, 420 अन्वये लोणीकंद पोलिस ठाण्यात गुरनं 237/2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात दिपक शिवाजी खलसे (30, रा. कुसमाडे वस्ती, कळसगांव, विश्रांतवाडी, आळंदी रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 3 ऑगस्ट 2022 पासुन आजपर्यंत आरोपींनी आपआपसात संगणमत करून
फिर्यादी दिपक खलसे यांच्यासह इतर व्यक्तींना जमीन खरेदीखत करून ताबा देतो असुन सांगुन त्यांच्याकडून 22 लाख 11 हजार 600 रूपये
घेतले. फिर्यादी खलसे आणि अन्य लोकांना त्यांनी खरेदी केलेल्या जमीनीचा ताबा न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे.
पोलिसांकडे (Pune Police) फिर्याद आल्याने त्यांनी गुन्हा दाखल केला. गुन्हयाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | A case has been registered against Nitin Gote, Rohit Gote, Tushar Khedekar, Rahul Morbale, Mithun Hargude in the 22 lakh fraud case.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Imtiaz jaleel | छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा, इम्तियाज जलील यांनी राम मंदिरातून केलं शांत राहण्याचं आव्हान (व्हिडिओ)

NCP MLA Amol Mitkari | ‘अन् तथाकथित ‘हिंदु जननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले, त्यामुळे…’, अमोल मिटकरींचा राज ठाकरेंना टोला

Pune Crime News | मुंढव्यात 16 वर्षीय मुलीला ब्लॅकमेल करून बलात्कार, 20 वर्षीय युवकास अटक