Pune Crime News | माथाडीच्या नावाखाली खंडणी मागणार्‍यावर गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | माल खाली करण्यासाठी माथाडीच्या नावाखाली खंडणी (Extortion Case) वसुल करण्याचे प्रकार वाढत असून वारजे परिसरात काचेचा माल खाली करण्यासाठी ८ हजार रुपयांची खंडणी (Ransom Case) मागणार्‍या गुंडावर वारजे पोलिसांनी (Pune Police) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

अविनाश दिलीप अडगळे (वय ३२, रा. म्हाडा कॉलनी, वारजे) असे त्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने वारजे पोलीस ठाण्यात (Warje Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५२/२३) दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी पिंपरीतील संतोष ग्लास या कंपनीकडून काचेचा माल मागविला होता. कंपनीचे कामगार टेम्पो घेऊन वारजे येथील म्हाडा कॉलनीत आहे.
माल खाली करु लागले, तेव्हा अविनाश अडगळे याने तेथे येऊन कामगारांवर धमकावून माल खाली करण्याचे
काम थांबविले. हमाली दरपत्रकाप्रमाणे प्रत्येक पेटीस १३७ रुपये प्रमाणे १२३३ रुपये अपेक्षित असताना
त्याने माल खाली करण्यासाठी ८ हजार रुपयांची मागणी केली.
पैसे दिले नाही तर फिर्यादी व कामगारांना मारहाण (Beating) करण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक पडवळे तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | A case has been registered against the extortionist in the name of Mathadi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Osmanabad News | उस्मानाबादमध्ये उरुसासाठी जमलेल्या गर्दीत वळू उधळून 14 भाविक जखमी

Parbhani Crime News | धक्कादायक ! जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहित महिलेचा केला गर्भपात

Pune Crime News | कोल्ड्रींगमधून गुंगीचे औषध टाकून महिलेवर केला बलात्कार; जबरदस्तीने लग्न करायला लावून मारहाण करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल

Test Cricket | 145 वर्षात पहिल्यांदाच टेस्ट क्रिकेटमध्ये असे घडले चंद्रपॉल- ब्रॅथवेटने नोंदवला ‘हा’ अनोखा विक्रम