Pune Crime News | विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल, पुण्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण (Beating) केली. पतीकडून सतत होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या (Suicide) केली. विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिचा पती आणि नणंद यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार आंबेगाव पठार व मोदीखाना कॅम्प येथे 1 जुलै 2014 ते 1 डिसेंबर 2023 या कालावधीत घडला आहे. (Pune Crime News)

प्रियंका विनायक पाटील (वय-29) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर पती विनायक आनंतराव पाटील (वय-39 रा. आंबेगाव पठार, पुणे) आणि नणंद वनिता मोरे (रा. कराड) यांच्यावर आयपीसी 498 अ, 306, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत मयत प्रियंका हिचे वडील तुकाराम खंडु कदम (वय-66 रा. नवा मोदी खाना कॅम्प, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) गुरुवारी (दि.7) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांची मुलगी प्रियंका हिचा विवाह विनायक पाटील याच्यासोबत 2014 मध्ये झाला होता. लग्नानंतर आरोपी पतीने प्रियांका हिचे एका व्यक्ती सोबत अफेअर असल्याचा संशय घेतला. त्याने प्रियंकाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वेळोवेळी मारहाण करुन शिवीगाळ केली. तर नणंद वनिता मोरे हिने लग्नाचा झालेला 15 लाख रुपये खर्च दे म्हणून छळ केला. आरोपींकडून सतत होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून प्रियंका हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कदम (API Kadam) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

विक्रीसाठी गांजा बाळगला, गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; साडे सात लाखांचा गांजा जप्त

पिंपरी : बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या टोळीचा दहशतवाद विरोधी पथकाकडून पर्दाफाश

नवाब मलिक महायुतीत नको, आमचा तीव्र विरोध, देवेंद्र फडणवीसांचे अजित पवारांना पत्र

हातात स्टेथोस्कोप, अंगावर ॲप्रॉन, आमदार धंगेकर डॉक्टरांच्या वेशभूषेत पोहचले विधानभवनात

इझी पे कंपनीची साडे तीन कोटींची फसवणूक, एजंटच्या साथीदारंना परराज्यातून अटक; पुणे सायबर पोलिसांची कारवाई