Pune Crime News | 33 लाखाच्या अपहार प्रकरणी वनाज सहकारी गृह रचना संस्थेच्या माजी अध्यक्षांसह 3 पदाधिकारी आणि 2 लेखा परिक्षाकांविरूध्द कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | वनाज सहकारी गृह रचना संस्थेच्या (VANAZ SAHAKARI GRUH RACHNA SANSTHA) माजी अध्यक्षांसह 3 पदाधिकारी आणि 2 लेखा परिक्षकांविरूध्द 33 लाख 22 हजार 378 रूपयांचा अपहार (Embezzlement) केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात (Kothrud Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

माजी अध्यक्ष दीपक चव्हाण (Deepak Chavan), माजी सचिव नितीन सुर्वे (Nitin Surve), माजी खजिनदार प्रकाश सोलकर Prakash Solkar (सर्व रा. वनाज सोसायटी, कोथरूड, पुणे), लेखा परिक्षक एम.आर. सलगर M.R. Salgar (रा. साडे सतरा नळी, हडपसर, पुणे) आणि लेखा परिक्षक धनश्री रत्नाळीकर
Dhanshree Ratnalikar (रा. पाषाण, पुणे) यांच्याविरूध्द भांदवि 420, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात लेखा परिक्षक श्रेणी-1 प्रतिभा सुरेंद्र घोडके (51, रा. नालंदा हाऊसिंग सोसायटी, बिबवेवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

सदरील गुन्हा हा सन 2014-15 ते सन 2018-19 दरम्यान वनाज सहकारी संस्था (वनाज कंपनीजवळ, पौड रोड, कोथरूड, पुणे) येथे घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी यांनी वनाज सहकारी गृह रचना संस्थेचे पदाधिकारी असताना 33 लाख 22 हजार 387 रूपये रक्कमेचा अधिकारात बेकायदेशीर गैरवापर केला. त्यांनी रक्कमेचा स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी अपहार केला. रक्कमेचा अपहार झाल्याचे संस्थेच्या अभिलेखावर असताना सन 2014-15 ते सन 2018-19 चे दरम्यान लेखा परिक्षण करणारे लेखा परिक्षक सलगर आणि रत्नाळीकर यांनी खरी व वास्त परिस्थिती व आर्थिक बाबी त्यांचे लेखा परिक्षण अहवालात न मांडता वनाज संस्थेचे नमूद पदाधिकारी आरोपी यांनी केलेल्या अपहारास संगणमताने सहाय्यक केले आहे.

 

पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा (IPS Suhail Sharma), सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar),
वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील (Sr PI Hemant Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरूड पोलिस गुन्हयाचा अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :-  Pune Crime News | A case has been registered in Kothrud police station against 3 office
bearers and 2 auditors along with the former president of Vanaj Sahakari Griha Rachna Sanstha in the case
of embezzlement of 33 lakhs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Palkhi Sohala 2023 | पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

Pune Police Mundhwa News | मुंढवा-केशवनगरमधील परिस्थिती चिंताजनक?, वरिष्ठ पोलिस निरीक्षक ‘एक्सटेन्शन’च्या ‘जुगाड’मध्ये

Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद 13 वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा !
30 यार्डस् क्रिकेट अ‍ॅकॅडमी, ए.के. स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी संघांची विजयी कामगिरी

Accident News | लग्नाला जाताना झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू; 5 महिला आणि 2 मुलांचा समावेश

Bhor Lok Nyayalaya | भोर येथे 11 मे रोजी विशेष लोकन्यायालयाचे आयोजन