Pune Crime News | सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली दरोडेखोरांची टोळी कोंढवा पोलिसांकडून गजाआड, 4 दुचाकीसह कोयता, तलवार जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा (Robbery) टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला कोंढवा पोलिसांनी (Pune Police) बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. ही कारवाई (Pune Crime News) 14 फेब्रुवारी रोजी उंड्रीकडे रोडवरील पिसोळी येथील मोकळ्या जागेत करण्यात आली. ताब्यात करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. आरोपींकडून 3 लाख 80 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

महेश बबन गजेसिंह (वय-28 रा.घोरपडी गाव, पुणे), रितेश आबा खरात (वय-27 रा. महंमदवाडी, पुणे), माधव नारायण अंकुशे (वय-22 रा. घुलेनगर, महंमदवाडी), महेंद्र नानासाहेब पाटील (वय-24 रा. महंमदवाडी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांच्या दोन अल्पवयीन साथिदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Pune Crime News)

कोंढवा पोलीस ठाण्यातील (Kondhwa Police Station) तपास पथक हद्दीत पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार सुजित मदन व सागर भोसले यांना माहिती मिळाली की, पिसोळी येथील समोरील मोकळ्या जागेत सहा ते सात जण तीन ते चार दुचाकी गाड्यांसह उभे आहेत. ते कात्रज कोंढवा रोडवरील धर्मावत पेट्रोल पंपावर (Dharmawat Petrol Pump) दरोडा टाकणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने घटनास्थळी जाऊन दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना ताब्यात घेतले.

आरोपींकडून दोन कोयते, तलवार, बुलेट, स्पेटंडर, ज्युपिटर, होंडा एक्सट्रीम अशा चार दुचाकी,
मिरची पावडर असा एकूण 3 लाख 80 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी महेश गजेसिंह हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर कोंढवा (Kondhwa Police Station), मुंढवा (Mundhwa Police Station), लोणी काळभोर (Loni Kalbhor Police Station), हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) सहा गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा
(Addl CP Ranjan Kumar Sharma), पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख
(Vikrant Deshmukh), सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे (ACP Pournima Taware),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Senior Police Inspector Santosh Sonawane),
पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले (Police Inspector Crime Sanjay Mogle) यांच्या मार्गदर्शनाखाली
तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील (PSI Swapnil Patil), पोलीस अंमलदार निलेश देसाई,
सतिश चव्हाण, गोरखनाथ चिनके, जोतिबा पवार, सुजित मदन, संतोष बनसुडे, सागर भोसले, सुरज शुक्ला,
लक्ष्मण होळकर यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime News | A gang of robbers who were preparing to carry out an armed robbery were arrested by the Kondhwa police, 4 bikes, a knife and a sword were seized

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | गोळीबार करुन लोखोंची रोकड लुटली, खेड शिवापूर मधील घटना

Latika Gorhe Passed Away | विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना मातृशोक