Pune Crime News | येरवड्यात 12 वाहनांची तोडफोड, दहशत निर्माण करणारी टोळी गजाआड

0
440
Pune Crime News | A gang was arrested for creating terror by vandalizing 12 vehicles in Yerwada
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी टोळक्याने रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड (Vandalism of Vehicles) केली. टोळक्याने येरवडा येथील भगवा झेंडा चौक ते सेवक चौकादरम्यान पार्क केलल्या 12 गाड्यांची तोडफोड केली. यामध्ये स्कूल व्हॅन (School Van), रिक्षा (Rickshaw), दुचाकीची (Two Wheeler) तोडफोड करुन नुकसान करण्यात आले. याप्रकरणी (Pune Crime News) चारजणांना येरवडा पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार बुधवारी (दि.1) मध्यरात्री दोनच्या सुमारास घडला.

सिद्धेश शेंडगे, तेजस शेंडगे (रा. लक्ष्मीनगर, येरवडा), करण उर्फ चिक्या अडागळे, मोईन शेख अशी अटक (Arrest) केलेल्यांची नावे आहेत. आदिसिंग आणि पाप्यासिंग फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी भरत चंद्रकांत वाजाणी (वय 48 रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात (Yerwada Police Station) तक्रार दिली आहे. पोलिसांनी सात जणांवर आयपीसी 143, 148, 149, 427 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा परिसरात दहशत माजविणसाठी टोळक्याने रस्त्यावरील वाहनांची
तोडफोड केल्याचे समोर आले आहे. तोडफोडीत रिक्षा, दुचाकी, स्कुलव्हॅनचा समावेश आहे.
आरोपींनी फिर्यादी यांच्या स्कुलव्हॅन च्या काचेवर लाकडी बांबु व दांडक्याने मारुन तोडफोड केली.
याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यांच्या फरार साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे (Police Inspector Uttam Chakra),
सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद खटके (API Pramod Khatke) यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

Web Title :- Pune Crime News | A gang was arrested for creating terror by vandalizing 12 vehicles in Yerwada

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

State Cabinet Expansion | राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार लवकरचं..; दक्षिण महाराष्ट्रात मिळू शकतात ३ मंत्रीपदे

Nitin Deshmukh | ‘नारायण राणे आणि नितेश राणे यांचा चेहरा पाहिला तर, ते महाराष्ट्रीयन सोडा…;’ आमदार नितीन देशमुख यांची राणे पिता-पुत्रावर टीका