Pune Crime News | गुन्हे शाखेकडून मोठा शस्त्र साठा जप्त! दोन डिलरसह सात सराईत गुन्हेगारांना अटक, 17 गावठी पिस्टल, 13 जिवंत काडतुसांसह 24 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) मोठा शस्त्र साठा जप्त (Weapons Seized) करुन 17 गावठी पिस्टल व 13 जिवंत काडतुसांसह 24 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करुन 7 आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी पिस्टल विक्री करणाऱ्या दोन डिलरचा देखील समावेश असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुनिल पवार, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 नारायण शिरगांवकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Pune Crime News)

पिस्टल विक्री करणारे डिलर हनुमंत अशोक गोल्हार (वय-24 रा. मु.पो. जवळवाडी ता. पाथर्डी जि. अहमदनगर), प्रदिप विष्णू गायकवाड (वय-25 रा. मु.पो. ढाकणवाडी ता. पाथर्डी मुळ रा. नगर रोड, चहाट फाटा, ता.जि. बीड) पिस्टल विकत घेणारे अरविंद श्रीराम पोटफोडे (वय-38 रा. अमरापुरता शेगाव जि. नगर) शुभम विश्वनाथ गरजे (वय-25 रा. मु.पो. वडुले, ता. नेवासा जि. नगर), ऋषिकेश सुधाकर वाघ (वय-25 रा. मु.पो. सोनई ता. नेवासा), अमोल भाऊसाहेब शिंदे (वय-25 रा. मु.पो. खडले परमानंद ता. नेवासा), साहिल तुळशीराम चांदेरे उर्फ आतंक (वय-21 रा. वरची आळी, बालमित्र मंडळाजवळ,सुसगाव) अशी अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime News)

पुणे शहरामध्ये अवैधरित्या पिस्टल (Pistol) बाळगणाऱ्या तसेच विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले होते. त्यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून हद्दीमध्ये पेट्रोलींग व गुन्हेगार चेकिंग मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत गुन्हे शाखा युनिट सहाच्या (Crime Branch Unit 6) पथकाने 25 फेब्रुवारी रोजी पिस्टल विक्री करणारे दोन डिलर हे वाघोली येथील नानाश्री लॉज समोर आल्याची माहिती मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे युनिट सहाच्या पथकाने सपाळा रचून हनुमंत गोल्हार, प्रदिप गायकवाड यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या महिंद्रा कारची झडती घेतली असता 1 गावठी पिस्टल व 2 जिवंत काडतुसे (Cartridges) मिळाली. पोलिसांनी कार, पिस्टल व काडतुस जप्त करुन आरोपींवर लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) गुन्हा दाखल करुन अटक केली.

पोलिसांनी आरोपींची पोलीस कस्टडी घेऊन सखोल चौकशी केली. त्यावेळी हनुमंत गोल्हार हा ए.पी.एम.सी पोलीस स्टेशन नवी मुंबई (APMC Police Station Navi Mumbai) येथील दोन कोटी 80 रुपयांच्या दरोड्यातील आरोपी असून पोलीस त्याचा शोध घेतल असल्याची माहिती समजली. तसेच पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidhyapeeth Police Station) त्याच्यावर आर्म अॅक्ट (Arm Act) नुसार गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात तो पाहिजे आरोपी असल्याचे समजले.

आरोपीकडे अधिक चौकशी केली असता अनधिकृत पिस्टल विक्री करणारे तसेच त्यांच्याकडून पिस्टल विकत घेणारे अरविंद पोटफोडे, शुभम गरजे, ऋषिकेश वाघ, अमोल शिंदे यांना अटक केली. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून 13 गावठी पिस्टल 4 काडतुसे तसेच एक महिंद्रा कार, मोबाईल असा एकूण 21 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याशिवाय गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाकडून पेट्रोलींग दरम्यान बाणेर रोड सिंचन भवन समोरून साहिल चांदेरे उर्फ आतंक याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्याच्याकडून 60 हजार रुपये किमतीची पिस्टल व 2 हजार रुपयांचे दोन जिवंत काडतुसे जप्त केली. त्याच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) गुन्हा दाखल करुन अटक केली. त्याच्याकडे अधिक तपास केला असता तो ज्या ठिकाणी काम करतो त्या गॅरेजमध्ये आणखी तीन पिस्टल व काही काडतुसे लपवून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी सुतारवाडी येथील गॅरेजवर छापा टाकून पिस्टल व काडतुसे जप्त केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 4 पिस्टल 9 काडतुसे असा एकूण 2 लाख 49 हजार रुपायांचा मुद्देमाल जप्त केला.

गुन्हे शाखेने केलेल्या दोन कारवयांमध्ये दोन डिलरसह 7 सराईत गुन्हेगारांना अटक करुन 17 गावठी पिस्टल,
13 जिवंत काडतुसे, एक महिंद्रा कार, मोबाईल असा एकूण 23 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुनिल पवार
(ACP Sunil Pawar), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 नारायण शिरगांवकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट -6 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल
(Senior Police Inspector Rajnish Nirmal),

युनिट -1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले (Senior Police Inspector Sandeep Bhosle),
सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उपनिरीक्षक अजय जाधव, सुनिल कुलकर्णी,
उप-निरीक्षक सुरेश जायभाय, भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे,
कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, नितीन मुंडे, मोहीते, ऋषिकेश ताकवणे,
ऋषिकेश व्यवहारे,ऋषिकेश टिळेकर, सचिन पवार, नितीन धाडगे, अश्पाक मुलाणी, ज्योती काळे, सुहास तांबेकर,
अमोल पवार, इम्रान शेख, आण्णा माने, आय्याज दड्डीकर, महेश बामगुडे, विठ्ठल साळुंखे, निलेश साबळे,
शुभम देसाई, दत्ता सोनवणे यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime News | A large stockpile of weapons seized from the crime branch! Seven Sarai criminals arrested along with two dealers, 17 Gavathi pistols, 13 live cartridges worth Rs 24 lakh seized

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Sada Sarvankar | शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांना ‘त्या’ प्रकरणात पोलिसांकडून ‘क्लिन चीट’

Urfi Javed | उर्फी जावेदने ‘या’ कारणामुळे खतरो के खिलाडी कार्यक्रमास दिला नकार