Pune Crime News | पीएमपी बसमध्ये तरुणीची छेडछाड करणार्‍या रोडरोमिओला शिकवला धडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | पीएमपी बसमधून (PMP Bus) प्रवास करणार्‍या तरुणीच्या मांडीला स्पर्श करुन तिची छेडछाड करणाऱ्या व बसमधून उतरल्यानंतरही तिचा पाठलाग करणाऱ्या रोड रोमियोला (Road Romeo) पोलिसांनी (Pune Police) चांगलाच धडा शिकवला. (Pune Crime News)

प्रभातकुमार तिवारी (वय २६, रा. कुरळी फाटा, चाकण) असे या अटक केलेल्या रोडरोमियोचे नाव आहे. याबाबत एका २० वर्षाच्या तरुणीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २९३/२३) दिली आहे. हा प्रकार भोसरी ते पुणे स्टेशन (Bhosari to Pune Station) असा प्रवास करत असताना तसेच पुणे स्टेशन येथे सोमवारी सायंकाळी ४ ते ५ वाजेच्या दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही मैत्रिणीबरोबर भोसरी ते पुणे स्टेशन असा बसने प्रवास
करीत होती. आरोपी प्रभातकुमार हा फिर्यादी यांच्या मागे उभा राहून जाणून बुजून त्यांच्या मांडीला स्पर्श करत होता.
त्यांनी हटकले तरी तो सातत्याने धक्का बसल्याचे दाखवत होता.
फिर्यादी या पुणे स्टेशन येथे बसमधून उतरल्यानंतर त्यांच्या पाठीमागे तो पाठलाग करत येत होता.
तेव्हा त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली.
पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक वाघमारे (PSI Waghmare) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Advt.

हे देखील वाचा

19 September Rashifal : वृषभ आणि मिथुन राशीवाल्यांसाठी दिवस धावपळीचा, वाचा दैनिक भविष्य

Diabetes – Mental Disease | ‘या’ मानसिक आजाराला बळी पडतो प्रत्येक दुसरा डायबिटीज रूग्ण, लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी

Pune Crime News | विश्रांतवाडी: टिंगरेनगरमध्ये वडिलाचा मुलाने केला खून