Pune Crime News | लग्नाचं आमिष दाखवून पुण्यातील अल्पवयीन मुलीची मध्य प्रदेशात विक्री, 50 हजार रुपयांना विक्री करणाऱ्या दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीची 50 हजार रुपयात मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) विक्री केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस (Pune Crime News) आला आहे. अल्पवयीन मुलीला विकून तिचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले. ही मुलगी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (Bharti Vidhyapeeth Police Station) हद्दीत राहत होती. पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन मुलीची सुटका करुन दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

 

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी शांती उर्फ सांतो हरनाम कुशवाह Santo Harnam Kushwaha (वय-40) आणि धमेंद्र यादव Dhamendra Yadav (वय-22) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन मुलीची मोठी बहिण पुण्यातील एका वर्कशॉमध्ये काम करत होती. त्यावेळी या तरुणीची ओळख आरोपी शांती सोबत झाली. शांतीने या तरुणीला तिच्या आवडीच्या असलेल्या मुलाशी लग्न लावून देते असे खोटे आश्वास देऊन तिला मध्य प्रदेशात घेऊन गेली. (Pune Crime News)

 

मध्य प्रदेशात घेऊन गेल्यानंतर शांतीने या तरुणीचे जबरदस्तीने अवघ्या 50 हजार रुपयांत धर्मेंद्र यादव या आरोपीशी लग्न लावून दिले.
दरम्यान, यादव याने शांतीला करण्यासाठी एक मुलगी शोध आणि पैसे घे असे सांगितल्याने हा सगळा प्रकार शांतीने केला.
पोलिसांनी या तरुणीचा शोध घेण्यासाठी मध्य प्रदेश गाठले आण आरोपींना अटक केली.
Web Title :- Pune Crime News | A minor girl from Pune was sold in Madhya Pradesh on the pretense of marriage, two arrested for selling them for Rs 50,000

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ashish Chandarana | म.रा.वि.मं.सूत्रधारी कंपनीच्या संचालकपदी आशिष चंदाराणा यांची नियुक्ती

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस धमकी प्रकरणातील आरोपी अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

Congress Leader Rahul Gandhi | लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधींना दुसरा धक्का! ‘सरकारी निवारा’ही जाणार