Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून आत्येभावाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, हडपसर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून आतेभावाने अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Minor Girl Rape Case) ठेवून फसवणूक (Cheating) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार हडपसर परिसरात 25 सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास पीडित मुलीच्या घरी घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात (Pune Police) आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत मांजरी बुद्रुक परिसरात राहणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन प्रसाद दत्तात्रय भाले Prasad Dattatraya Bhale (रा. मु.पो. शेडगाव टाकळी, ता. श्रीगोंदा, जि. नगर) याच्यावर आयपीसी 376 सह पोक्सो कलम 4, 8, 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भाले हा फिर्य़ादीच्या आत्याच्या मुलगा आहे. गणेश उत्सवानिमित्त (Pune Ganeshotsav) 25 स्पटेंबर रोजी तो फिर्य़ादीच्या घरी आला होता. त्यावेळी दुपारी दोनच्या सुमारास फिर्य़ादी घरी टीव्ही बघत असताना आरोपी भाले हा मुलीजवळ आला व म्हणाला की, मला तू खूप आवडतेस. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. आपण लवकरच लग्न करु, असे आश्वासन दिले. गोड बोलून तिचा विश्वास संपादन केला. यानंतर घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन आरोपी भाले याने फिर्य़ादी यांच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक गांधले (PSI Ashok Gandhale) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

बनावट कागदपत्रांच्या आधारे पुण्यातील बँकेची 21 लाखांची फसवणूक

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये वाद, अश्लील मेसेज करुन तरुणीचा विनयभंग; पुण्यातील प्रकार

पुण्यात मराठी पाट्यांसाठी आंदोलन, मनसेच्या पदाधिकारी व कार्य़कर्त्यांवर डेक्कन, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेल करत केला बलात्कार; लष्करातील जवानावर FIR

नवले पुलाजावळ पुन्हा अपघात, कंटेनरची पाच वाहनांना धडक; चार जखमी (Video)

मौजमजेसाठी चोरीच्या दुचाकी विक्री करणारे एजंट कोंढवा पोलिसांकडून गजाआड, 15 दुचाकी जप्त

सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणार्‍या जेम्स व्हिल शापुरजी हौसिंग प्रा.लि. कंपनीला एक लाख रुपयांचा दंड