Pune Crime News | अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार; व्हिडिओ क्लीप व्हायरल करायची दिली धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | अल्पवयीन मुलीला प्रेमात पाडून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार (Rape) केला. त्यानंतर तिचे नग्न अवस्थेतील व्हिडिओ काढून ती व्हायरल करण्याची धमकी देणार्‍यास लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. (Pune Crime News)

 

हणमंत किसन सांगळे (वय २४, रा. गणेशनगर, वाघोली) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ३५ वर्षाच्या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६६/२३) दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२१ ते १६ जानेवारी २०२३ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १६ वर्षाची मुलगी असून तिला हणमंत सांगळे याने प्रेमात पाडले. तिला लग्नाचे आमिष दाखवून केसनंद फाटा येथील लॉजवर नेऊन तिच्याशी वारवांर शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवले. तिचे नग्न अवस्थेतील व्हिडिओ क्लीप व फोटो काढले. ते फोटो व व्हिडिओ क्लीप फिर्यादी यांच्या मुलीच्या व्हॉटसअ‍ॅपवर पाठविले. ही व्हिडिओ क्लिप पाहिल्यावर त्यांची मुलगी घाबरुन गेली. त्यामुळे तिने सांगळेशी संबंध तोडला. तेव्हा त्याने तिला तू जर मला पुन्हा व्हिडिओ कॉल केला नाही तर तुझे काढलेले नग्न अवस्थेतील व्हिडिओ क्लिप व फोटो तुझ्या आईला पाठविन अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरुन तिने हा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक भदे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | A minor girl was raped by luring her into marriage;
Threatened to make the video clip viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा