Pune Crime News | वानवडी गावात टोळक्याचा धुडगूस; वाहनांवर दगडफेक करुन केली नासधुस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | आपल्या भांडणाचा राग काढण्यासाठी नागरिकांच्या पार्क केलेल्या वाहनांवर काढण्याचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे. कोंढव्यात टोळक्यांनी नुकताच धुडगुस घालत वाहनांची तोडफोड करण्याच्या प्रकारानंतर वानवडी (Wanwadi News) गावात रविवारी पहाटे पुन्हा असाच प्रकार घडला आहे. हा प्रकार गावठाणातील गल्लीमध्ये पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. (Pune Crime News)

 

याबाबत वानवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी गावात छोट्या छोट्या गल्लीमध्ये नागरिकांनी आपली वाहने पार्क केली होती. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ४ ते ५ जणांचे टोळके हातात कोयते, लाठ्या काठ्या घेऊन आले. त्यांनी रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. कार, रिक्षा यांच्यावर कोयते मारुन त्यांच्या काचा फोडण्यात आल्या. पार्क केलेल्या दुचाकी ढकलून देण्यात आल्या. त्यात २ कार, २ रिक्षा आणि अनेक दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. आवाज ऐकून नागरिक बाहेर आले. तोपर्यंत हे टोळके पळून गेले. सर्व नागरिक झोपलेले असल्याने हे टोळके कसे आले होते आणि कशासाठी आले होते?. तोडफोड करण्यामागचे कारण काय?. याची माहिती मिळू शकलेले नाही. या घटनेची माहिती मिळाल्यावर वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) घटनास्थळी धाव घेतली. पोलीस तपास करीत आहेत. (Pune Crime News)

दोनच दिवसांपूर्वी पूर्ववैमनस्यातून एका टोळक्याने लाडप्पा याच्यावर कोयत्याने वार करुन त्याच्या हाताचा पंजा तोडला होता. त्यावरुन त्याच्या साथीदारांनी कोंढव्यात जाऊन वाहनांची तोडफोड केली होती. त्यात तब्बल १४ वाहनांचे नुकसान झाले होते. त्यानंतर वानवडी गावात आज पुन्हा असाच प्रकार झाला आहे.

 

Web Title :  Pune Crime News | A mob raid in Wanavadi village; Stones pelted vehicles and destroyed them

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा