लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मारहाणीच्या गुन्ह्यातील आरोपीला तपासासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगतल्याच्या रागातून टोळक्याने पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण (Beating the Policeman) केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी (Pune Crime News) आठ ते दहा जणांवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात (Lonavala Rural Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टोळक्याने केलेल्या मारहाणीत पोलीस नाईक अजिज जब्बार मेस्त्री (Police Naik Aziz Jabbar Mestri) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी अतुल गौड, दिनेश मारवाडी, आकाश चोर,विनायक शिंदे, प्रशांत शिंदे, वैभव साठे यांच्यासह आठ जणांच्या विरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
अतुल गौड याच्यावर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात (Lonavala City Police Station)मारहाणीचा गुन्हा दाखल होता. दाखल गुन्ह्यात गौड याला तपासासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास अजिज मेस्त्री यांनी सांगितले होते. लोणावळा परिसरातील ओकळाईवाडी परिसरात आरोपींनी मेस्त्री यांना गाठले.
आरोपी विनायक शिंदे यांनी मेस्त्री यांच्या डोक्यात दगड मारला.
तर वैभव साठे याने गजाने मारहाण केली. या घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कारंडे (APIKarande) करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | A policeman was beaten up by a gang in Lonavala, FIR
against 8 to 10 people
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Shubman Gill | शुभमन गिलने शतकी खेळी करत ‘हे’ विक्रम केले आपल्या नावावर; दिग्गजांनाही टाकले मागे