Pune Crime News | 28 लाख मागणाऱ्या खासगी सावकाराला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात (Pune Crime News) खासगी सावकारांचा सुळसुळाट झाला आहे. खासगी सावकारांकडून कर्जाची वसुली करण्यासाठी तगदा लावला जातो. सावकाराकडून होत असलेल्या पठाणी व्याज वसुलीच्या (Interest Recovery) संदर्भात पोलिसांकडे अनेक तक्रारी येत आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या (Pune Police Crime Branch Unit 2) पथकाकडे बेकायदेशीर सावकारी बाबत तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची चौकशी करुन (Pune Crime News) पोलिसांनी एका सावकाराला अटक (Arrest) केली आहे.

 

खासगी सावकार दुर्गेश कुमार पांडे (वय-33 रा. रॉयल हॅरिटेज रोड सातवनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर जे. जी. उर्फ सागर धोत्रे याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे. याबाबत प्रदिप दिगंबर दड्डीकर (वय-36 रा. खराडी) यांनी गुन्हे शाखा युनिट दोनकडे तक्रार केली होती. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रदिप दड्डीकर यांनी आरोपींकडून 10 लाख रुपये व्याजाने घेतले होते. 10 लाखाच्या मोबदल्यात आरोपींनी 28 लाख रुपयांची वसुली केली. याबाबत तक्रारदार यांनी अर्ज केल्यावर चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान आरोपींनी पैसे वसूल केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आरोपींवर विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimantal Police Station) गुन्हा (FIR) दाखल करुन आरोपी दुर्गेश कुमार पांडे याला विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Police Inspector Kranti Kumar Patil),
पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे (PSI Nitin Kamble), पोलीस अंमलदार शंकर नेवसे, कादिर शेख, समीर पटेल, नवनाथ राख यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | A private moneylender who demanded 28 lakhs was arrested by the crime branch

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MPSC Exam 2023 | मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत या वर्षी भरली जाणार “एवढी” पदे

Keshav Upadhye | भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवक्तेपदी केशव उपाध्ये यांची फेरनियुक्ती

Pune Pimpri Crime News | घरभाडे थकवून घर मालकीणीला बेदम मारहाण करत केला विनयभंग, मोशीमधील धक्कादायक घटना