Pune Crime News | पुणे विद्यापीठात तरुणीवर रिक्षाचालकाचा जबरदस्तीचा प्रयत्न; पावसामुळे रिक्षा केल्याचा घेत होता गैरफायदा

पुणे : Pune Crime News | एका तरुणीला पुणे विद्यापीठात (Pune University) यायचे होते. त्यात अचानक सायंकाळी पाऊस (Rain In Pune) पडु लागल्याने तिने रिक्षा केली. रिक्षाचालकाने आडबाजूला रिक्षा थांबवून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी एका १८ वर्षाच्या तरुणीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrangi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २२२/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रिक्षाचालकावर विनयभंगाचा (Molestation) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार कोथरुड येथील एम आयटी ते पुणे विद्यापीठ (MIT to Pune University) प्रवासादरम्यान गुरुवारी सायंकाळी पाच ते पावणेसहा दरम्यान घडला. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशखिंड रोडवर राहणारी ही तरुणी एमआयटीमध्ये शिक्षण घेत आहे. तिचे पुणे विद्यापीठात काम होते. त्यासाठी ती पुणे विद्यापीठात येत असताना अचानक पाऊस सुरु झाला.
तेव्हा तिने रिक्षा केली. या तरुणीला पुणे विद्यापीठाची काही माहिती नव्हती.
हे रिक्षाचालकाच्या लक्षात आल्यावर त्याने तिच्याशी चाळे करण्यास सुरुवात केली.
तिने विरोध केल्यावर त्याने विद्यापीठात एका बाजूला रिक्षा थांबवून मागे आला.
तिच्या अंगावर झोपण्याचा प्रयत्न करुन तिचा किस घेऊ लागला. तेव्हा तिने विरोध करुन ती रिक्षाबाहेर आली.
तेव्हा त्याने जबरदस्तीने फिर्यादीचा मोबाईल नंबर घेऊन सचिन नावाने तो सेव केला.
या प्रकारानंतर फिर्यादी यांनी तातडीने चतु:श्रृंगी पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस रिक्षाचालकाचा शोध घेत आहे.
Web Title :- Pune Crime News | A rickshaw puller attempted to force a young woman in Pune University; Taking advantage of rickshaws due to rain
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Paytm News Features | पेटीएम वर ‘हे’ फीचर एक्टिवेट करा आणि मिळावा 100 रुपये कैशबैक