Pune Crime News | हनी ट्रॅप करुन मॉडेल कॉलनीतील ज्येष्ठ नागरिकाला लुबाडले

पुणे : Pune Crime News | व्हॉटसअॅपद्वारे चॅटिंग (WhatsApp Chatting) करुन लैगिक भावना उत्तेजित करुन नग्न होण्यास भाग पाडून तो व्हिडिओ व्हायरल (Video Viral) करण्याची धमकी देऊन एका ज्येष्ठ नागरिकाला ४ लाख ६६ हजार रुपयांना लुबाडल्याचे समोर आले आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी मॉडेल कॉलनीमधील एका ६४ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २३८/२३) दिली आहे. हा प्रकार २१ ते २५ मार्च दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी असताना त्यांना व्हॉटसअॅपवर कॉल आला.
त्यांच्याशी एका तरुणीने चॅटिंग व व्हिडिओ कॉल करुन त्यांच्या लैगिक भावना उत्तेजित करणारा व्हिडिओ दाखविला.
त्यांना नग्न होण्यास भाग पाडले. फिर्यादी यांचा हा व्हिडिओ कॉल स्क्रीन रेकॉर्डिंग (Screen Recording) केला.
त्यानंतर त्यांना हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्या पैसे मागण्यास सुरुवात करण्यात आली.
त्यांनी पैसे दिल्यानंतर दुसर्यांनी पोलीस असल्याची बतावणी करुन हा व्हिडिओ युट्युबवरुन डिलिट करण्याचे
चार्जेस म्हणून त्यांच्याकडून ४ लाख ६६ हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक (Cheating Case) केली.
पोलीस निरीक्षक चिंतामण (PI Chintaman) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | A senior citizen of Model Colony was robbed by honey trap
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update