
Pune Crime News | पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना! डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात अर्भकाचा मृत्यू, डॉक्टरवर FIR
बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे जिल्ह्यात खळबळजनक घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या हालगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी बारामती येथील डॉ. तुषार गोविंद गदादे (Dr. Tushar Govind Gadade) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या प्रसूतीच्या वेळी दवाखान्यात डॉक्टर उपस्थित नसल्याने बालकाचा मृत्यू (Child’s Death) झाला आहे. हा प्रकार डिसेंबर 2022 मध्ये घडला होता. (Pune Crime News)
काय आहे प्रकरण?
22 डिसेंबर 2022 रोजी पद्मिनी गोपाळ गायकवाड यांना नववा महिना सुरु असल्याने त्या गदादे डॉक्टरांकडे गेल्या होत्या. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेतले. गायकवाड यांना अॅडमिट करुन डॉक्टर बाहेर निघून गेले. त्यांच्या गैरहजेरीमध्ये त्यांनी आर्हताधारक डॉक्टर अथवा नर्स उपलब्ध ठेवले नाहीत. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालाचा मृत्यू झाला. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात (Baramati City Police Station) आयपीसी 304(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
डॉक्टरांचा हलगर्जीपणा
प्रसुती दरम्यान बाळ दगावण्याच्या घटना घडल्याचे ऐकले असेल. त्यानंतर डॉक्टरांवर आरोपही केल्याचे पाहिले आहे.
त्यामुळे डॉक्टरांचा हलगर्जीपणा सतत समोर येत आहे. तरी देखील डॉक्टरांकडून आरोपांचे खंडन करुन आरोप फेटाळून
लावले जातात. मात्र, या प्रकारणात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हे नवजात अर्भक दगावल्याचे स्पष्ट झाले आहे.
आपल्या अनुपस्थितीत पर्यायी सोय उपलब्ध न करुन देता रुग्णालयात अनुपस्थित राहिल्याने बाळाचा मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबियांनी थेट डॉक्टरांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी डॉ तुषार गोविंद गदादे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update