Pune Crime News | प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरूणीची आत्महत्या, पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून तरुणीला तिच्या राहत्या घरातून पळवून नेले. यानंतर तिच्यासोबत शरीरसंबंध (Physical Relationship) ठेवले, मात्र नंतर प्रियकराने (Boyfriend) लग्नाला नकार दिल्याने एका 19 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide Case) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी प्रियकरावर लोणी काळभोर पोलीस (Pune Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत आत्महत्या करणाऱ्या तरुणीच्या 52 वर्षीय वडिलांनी (रा. राजुरी ता. पुरंदर) रविवारी (दि.26) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी आदित्य अशोक जाधव Aditya Ashok Jadhav (रा. राजुरी ता. पुरंदर जि. पुणे) याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.24) सकाळी साडे अकराच्या सुमारास उरुळी देवाची येथे घडली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि आरोपी आदित्य जाधव हे एकाच गावचे आहेत. आरोपी आदित्य याने फिर्यादी यांच्या 19 वर्षाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला घरातून पळवून नेले. तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. यानंतर पीडित मुलीने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. तसेच ‘तुला काय करायचे ते कर किंवा कुठे जावुन मर, मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही’ असे बोलून तिला मानसिक त्रास दिला. यामुळे फिर्यादी यांच्या मुलीला नैराश्य आले. दरम्यान, मुलगी उरुळी देवाची येथे मामाच्या घरी आली. तिने नैराश्यातून मामाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : ‘मोठ मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांना ओळखतो’ म्हणत महिलेकडे पाहून अश्लील हावभाव, विनयभंग करणाऱ्या दोघांवर FIR

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना कोंढवा पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केली अटक, 4 महिन्यांपासून होते फरार

प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत, १२४ बांधकाम व्यावसायिकांना नोटीस

दोन एटीएम फोडले… हाती लागले केवळ 1900 रुपये; जुन्या सांगवीमधील घटना

विरुद्ध दिशेने येणाऱ्या मिनीबसची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी; चिंचवड येथील घटना

पिंपरी : साई चौकातील अवैध हुक्का बारवर पोलिसांचा छापा, 1 लाखाचा मुद्देमाल जप्त