Pune Crime News | एकट्या चोरट्याने तीन ठिकाणी हिसकाविले महिलांच्या गळ्यातील दागिने

पुणे : Pune Crime News | मोटारसायकलवरुन आलेले दोन चोरटे महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवित असल्याचे आजवर आढळून आले आहे. परंतु, एका चोरट्याने एकट्याने एका पाठोपाठ तीन ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेण्याचा प्रकार रविवारी दिवसभरात घडला आहे. (Pune Crime News)

यातील पहिली घटना बिबवेवाडी येथील पासलकर चौकाजवळ रविवारी दुपारी १ वाजता घडली. याबाबत पर्वती दर्शन येथील एका ५२ वर्षाच्या महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी या पतीसह मोटारसायकलवरुन घरी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या चोरट्याने त्यांच्या घरातील १७ ग्रॅम वजनाचे ५५ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावले. परंतु, त्यांनी हे मंगळसुत्र धरल्याने त्याचा अर्धा भाग चोरट्याकडे गेला. तो घेऊन चोरटा पळून गेला.

दुसरी घटना कोथरुडमधील महात्मा सोसायटीतील भुजबळ टाऊनशिप येथे दुपारी पावणेतीन वाजता घडली. याबाबत एका ५६ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी या मुलीसह एका कार्यक्रमावरुन घरी जात होत्या. त्यावेळी त्यांची मुलगी खरेदी करण्यासाठी दुकानात गेल्याने त्या रस्त्याच्या कडेला वाट पहात थांबल्या होत्या. तेव्हा मोटारसायकलवरुन आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १ लाख ९० हजार रुपयांचे ५० ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र हिसकावून नेले. (Pune Crime News)

तिसरी घटना कर्वे रोडवरील डेक्कन जिमखान्यावरील सावरकर चौकात दुपारी साडेतीन वाजता घडली.
याबाबत हडपसर येथील एका ३२ वर्षाच्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station)
फिर्याद दिली आहे. फिर्यादी या आपल्या पतीसह मोटारसायकलवरुन जात होत्या.
सावरकर चौकात सिग्नल लागल्याने ते सिग्नलला थांबले होते.
त्यावेळी पाठीमागून आलेल्या मोटारसायकलवरुन चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे ११ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून तो पळून गेला. या तिन्ही चोर्‍या एकाच चोरट्याने केल्याचा पोलिसांना संशय आहे.

Web Title :-  Pune Crime News | A single thief snatched jewelry from women’s necks at three places

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Peth Bypoll Election | कसब्यातील ”त्या” पोस्टरने खळबळ; भाजपच्या गोटात वाढली चिंता

Satara Crime News | साताऱ्यातील ‘त्या’ खुनातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश; दापोलीमधून आरोपींना अटक

Pune Crime News | स्त्रीधन, पोटगी म्हणून मिळालेली रक्कम लांबवली; मुलीने आपल्याच वडिल, भावाविरुद्ध दिली तक्रार