Pune Crime News | भरधाव डंपर चालकाने रोड क्रॉस करणाऱ्या इसमास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू, गुन्ह्यातून डंपर चालकाची निर्दोष मुक्तता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | दारूचे सेवन करुन डंपर चालक गोल्फ क्लब रोडने (Golf Club Road) भरधाव वेगाने जात असताना एका इसमास धडक लागून एक इसम गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच डंपर ड्रायव्हर अपघात करून पळून गेल्याचा आरोप असलेल्या आरोपी डंपर ड्रायव्हर गणेश संभाजी दूधभाते (रा- केसनंद रोड, वाघोली पुणे. मुळ गाव निलंगा, जि. लातूर) या आरोपीची या गुन्ह्यातून सबळ पुरावा नसल्याने निर्दोष मुक्तता (Acquittal) करण्यात आली आहे. हे आदेश जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. जी. डोरले (District Additional Sessions Judge J. G. Dorle) यांनी दिले आहेत. (Pune Crime News)

सविस्तर माहिती अशी की, दि. 28 मे 2014 रोजी फिर्यादी अनिल मारुती पालांडे पोलीस हवालदार येरवडा पोलीस स्टेशन
(Yerawada Police Station) पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. 27 मे 2014 रोजी रात्री 10:00 वाजण्याच्या सुमारास निसर्ग हाउसिंग सोसायटी गार्डन समोरील गोल्फ क्लब रोडवर दारूचे सेवन करून डंपर परवाण्यापेक्षा जास्त खडी ओवरलोड भरून गोल्फ क्लब रोडने आंबेडकर चौकाकडे भरधाव वेगाने जात होता. निसर्ग हाउसिंग सोसायटी गार्डन समोर रस्ता क्रॉस करण्यासाठी थांबलेला इसम विलास मनोहर कापसे यास धडक देऊन गंभीर जखमी करून जाणीवपूर्वक अपघात करून पळून गेल्या बाबत आरोपीवर भा. द. वि. कलम 304, 279 मोटर व्हेईकल ऍक्ट कलम 119, 184, 177, 132 (1) (c) अंतर्गत गुन्हा दाखल केला. (Pune Crime News)

या केस मध्ये सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले, त्याचप्रमाणे आरोपी तर्फे
ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर (Adv. Jitendra Ashok Janapurkar) यांनी संपूर्ण साक्षीदारांची उलट तपासणी
घेऊन अंतिम युक्तवाद केला. आरोपी विरुद्ध सबळ पुरावा नसल्याच्या अभावी आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
आरोपीतर्फे ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांनी सदर खटला चालवला तसेच ॲड. आनंद चव्हाण (Adv. Anand Chavan),
ॲड. मयूर चौधरी (Adv. Mayur Chaudhary), ॲड. अक्षय पवार (Adv. Akshay Pawar) यांनी कामकाज पाहिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime News | नातेवाईकांच्या नावाने फर्म बनवून इंनटेक्स कंपनीला 2 कोटींचा गंडा; पिंपरी चिंचवड परिसरातील प्रकार; 22 वर्षीय तरुणीसह परराज्यातील चौघांवर FIR

NCP MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, खोके सरकारमुळे महाराष्ट्र अस्थिर, छगन भुजबळांसारख्या…

Pune Pimpri Crime News | मनाविरुद्ध मुलाला जन्म दिल्याने विवाहितेचा छळ, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व सासूला अटक; भोसरी परिसरातील घटना