Pune Crime News | पुण्यात उपचारासाठी आलेल्या महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवून बलात्कार

पुणे : Pune Crime News | उपचारासाठी अनेक दिवस रहावे लागणार असल्याने भाड्याने रुम दाखविण्याचा बहाणा करुन एका महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी संजय बाजीराव भोसले (वय ५२, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) याला अटक केली आहे. याबाबत गाझीयाबाद येथील एका ३९ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५३/२३) दिली आहे. हा प्रकार हडपसरमधील जयप्रकाश सोसायटीत ५ जानेवारी रोजी दुपारी घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझीयाबाद येथील एक महिला मणक्याचा त्रास असल्याने उरुळी कांचन (Uruli Kanchan) येथील निसर्गोपचार केंद्रात उपचार घेण्यासाठी आल्या होत्या. अनेक दिवस उपचार घ्यायचे असल्याने त्यांना राहण्यासाठी भाड्याने रुम पाहिजे होती. त्यांनी संजय भोसले यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्याने रुम दाखविण्याचा बहाणा करुन त्यांना जयप्रकाश सोसायटीत नेले. तेथे त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्यावर बलात्कार केला. ही बाब कोणाला सांगितल्यास बघून घेईन, अशी धमकी दिली. हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) त्याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक थोरबोले तपास करीत आहेत.

Web Title :-Pune Crime News | A woman who came for treatment in Pune was raped at gunpoint

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

KGF 3 | रॉकी भाईच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली ! KGF 3 च्या रिलीज डेट बाबत समोर आली ‘हि’ मोठी अपडेट

Aadhaar Card Security | आधार धारकांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ टिप्स फॉलो करून आधार डाटा ठेवा सुरक्षित, जाणून घ्या डिटेल्स