पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मुंबई येथून तुमच्या नावाने तैवान येथे पार्सल गेले, परंतु त्यात ड्रग्स (Drugs) सापडले आहे. तसेच तुमच्या बँक खात्यातून मनी लॉन्ड्रींग (Money Laundering) होत असल्याचे सांगून बँकेची सर्व माहिती घेऊन पुण्यातील खराडी येथील एका तरुणाची 3 लाख 5 हजार 200 रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
याबाबत विक्रम अनिल माणके (वय-32 रा. थिटे वस्ती, खराडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी 638062XXXXX या मोबाईल धारकावर चंदननगर पोलिस ठाण्यात आयपीसी 419, 420, 34 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाला अज्ञात व्यक्तीने 4 सप्टेंबर रोजी संपर्क साधला. आपण मुंबई अंधेरी ब्रँच मधून बोलत असल्याचे सांगून, तशा प्रकारचा स्काईप प्रोफाइल नाव असलेले स्काईप अकाउंट धारक याने फेडेक्स कंपनी (FedEx Company) व पोलिस असल्याची बतावणी केली. तसेच तरुणाच्या नावाने मुंबई ते तैवान पार्सल पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये 140 ग्रॅम एमडीएमए हा अमली पदार्थ सापडला आहे, असे सांगीतले. (Pune Crime News)
तसेच तुमच्या बँक खात्यातून मनी लॉन्ड्रींग होत असल्याचे सांगून त्यासाठी तुमचे आधार कार्ड वापरल्याचे सांगितले.
यानंतर सायबर (Cyber Crime) भामट्याने फिर्य़ादी यांच्या बँक खाते व्हिरिफाय करायचे असल्याचे सांगून बँक
खात्याची माहिती घेतली. त्यानंतर फिर्यादी यांच्या आयसीआयसीआय बँक खात्यातून 3 लाख 5 हजार 200 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करुन घेऊन आर्थिक फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी विक्रम माणके यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) फिर्याद दिली. सायबर पोलिसांनी हा गुन्हा चंदननगर पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे (Sr. PI Rajendra Landge) करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Petrol-Diesel Price | शेअर मार्केटमध्ये घसरण, पेट्रोल-डिझेलवर परिणाम होणार? आजचे दर जाणून घ्या