Pune Crime News | ऑनलाईन टास्क देऊन पुण्यातील तरुणाची एक लाखाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | टास्क पूर्ण केल्यानंतर जास्त पैसे मिळतील असे आमिष दाखवून पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील तरुणाची 1 लाख 9 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केली. हा प्रकार 2 ते 3 नोव्हेंबर दरम्यान तरुणाच्या राहत्या घरी ऑनलाईन पद्धतीने झाला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध (Cyber Thieves) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत दिपक नंदु भराड Deepak Nandu Bharad (वय-28 रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) सोमवारी (दि.4) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन टेलीग्राम आयडी (Telegram) धारकांवर आयपीसी 419, 420 सह आयटी अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक भराड हे त्यांच्या घरी असताना सायबर चोरट्यांनी टेलीग्राम द्वारे
संपर्क साधला. ऑनलाईन टास्क (Online Task) पूर्ण केल्यानंतर जास्त पैसे मिळतील असे आमिष दाखवून फिर्यादी
यांना विविध टास्क पूर्ण करण्यास सांगितले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादी यांच्याकडे पैशांची मागणी केली.
त्यानुसार फिर्यादी यांनी आरोपींनी दिलेल्या बँक खात्यात पैसे जमा केले. मात्र, त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी फिर्यादी
यांना कोणत्याही प्रकारचा टास्क अथवा घेतलेले पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात
आल्यानंतर दीपक भराड यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे विजय पुराणीक (PI Vijay Puranik) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena UBT | अदानी आणि सरकारला शिवसेना विचारणार जाब, १६ डिसेंबरला मुंबईत मोर्चा

Congress Nana Patole | शिंदे-फडणवीस-पवार सरकारने गुन्हेगारीत महाराष्ट्राला युपीच्या पंगतीत बसवले : काँग्रेस

Pune Crime News | ‘आमच्याकडून जागा घ्या अन् आम्हालाच भाड्याने द्या’, जागेच्या किमतीच्या 10 टक्के प्रमाणे भाडे देण्याचे आमिष दाखवून कोटीची फसवणूक

पुण्यातील जनवाडी परिसरात गुंडांची दहशत, तलवारी उगारून तीन दुकानांची तोडफोड; दोघांना अटक

Shivsena UBT | शिवसेनेचे मोदी सरकारला आव्हान, हिंमत असेल तर लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या