Pune Crime News | बलात्काराची तक्रार दिल्याने तरुणाचा अल्पवयीन युवतीच्या घरासमोर धिंगाणा; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | प्रेमसंबंधातून बलात्कार (Rape in Pune) केल्याने ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. तिने एका मुलाला जन्म दिल्यानंतर तिच्या आईच्या तक्रारीवरुन कोंढवा पोलिसांनी (Pune Police) बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आता या नराधमाने तिच्या घरासमोर येऊन धिंगाणा घालून तिचा विनयभंग (Molestation) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी सुरज भारत पवार (वय २६, रा. येवलेवाडी, कोंढवा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका १७ वर्षाच्या मुलीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १००/२३) दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांचे पूर्वी प्रेम संबंध होते. त्यातून आरोपीने ती अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. त्यातून फिर्यादी ही गर्भवती राहिली. तिने एका मुलाला जन्म दिला. गेल्या वर्षी जानेवारी २०२२ मध्ये तिच्या आईने फिर्याद दिल्याने सुरज पवार याच्याविरुद्ध पोलिसांनी बलात्कार व पोक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर फिर्यादी या लोणी काळभोर येथील घरी असताना १ फेब्रुवारी रोजी आरोपी त्यांच्या घरी आला. फिर्यादीचे नाव घेऊन जोर जोरात ओरडून धिंगाडा घातला. फिर्यादीचा पाठलाग केला. त्यामुळे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
Web Title :- Pune Crime News | A young man lynched in front of a minor girl’s house
for reporting rape; FIR at Loni Kalbhor Police Station
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Narayan Rane | नारायण राणे आणि पत्रकारांमध्ये शाब्दिक बाचाबाची, म्हणाले-‘तुम्ही पत्रकार नसून शिवसेनेचे प्रवक्ते’
- Pune Crime News | माथाडीच्या नावाखाली खंडणीखोरी करणार्यांविरोधात मोहीम; एकाच दिवसात
विमानतळ पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल, दोन महिन्यांनी घेतली दखल - Pune Traffic Update News | पुण्याच्या वाहतूक कोंडीत अडकले खुद्द पोलीस अधिकारी, 2 किमीच्या अंतरासाठी लागला दीड तास