Pune Crime News | बायकोला सांभाळता येत नाही का असे बोलल्यावरुनच्या वादात तरुणाला मारहाण; विनयभंगाचा गुन्हाही दाखल

पुणे : Pune Crime News | धुलीवंदन साजरा करुन गल्लीतील लोक हॉटेलमध्ये एकत्र जेवण्यासाठी गेले असताना एकाने तरुणाला तुझी बायको तुला सांभाळता येत नाही का असे बोलला. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. वादाचे रुपांतर भांडणात होऊन टोळक्याने तरुणाला मारहाण (Beating) करुन रिक्षावर दगडफेक करुन नुकसान केले. त्यानंतर याच तरुणावर एका महिलेने चापट मारुन विनयभंग (Molestation Case) केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी विजय धनराज गिते (वय २८, रा. दुबे नगर, वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १९५/२३) दिली आहे. त्यानुसार त्यांच्याच गल्लीतील महिला, तिचा पती व इतर चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चालक आहेत. त्यांची पत्नी माहेरी गेली आहे.
मंगळवारी ते गल्लीतील लोकांसोबत धुलीवंदन खेळले.
त्यानंतर दुपारी जेवणासाठी केसनंद वाडे बोल्हाई रोडवरील हॉटेल गारवा येथे सर्व जण जेवणासाठी गेले. जेवण करीत असताना दादाराव फिर्यादी यांना तुला तुझी बायको सांभाळता येत नाही. सारखा तिच्यासोबत भांडत असतो, असे बोलले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. तेव्हा फिर्यादी यांनी तू मला शिकवू नको, मी माझे बघतो काय करायचे, असे बोलून ते तेथून निघून घरी आले. त्यानंतर काही वेळात दादाराव इतरांना घेऊन त्यांच्या घरी आले. त्यांच्या तोंडात मारली. घराच्या दरवाज्यावर, खिडकीवर दगड मारुन काचा फोडल्या. गजाने मारहाण केली. दारात उभ्या असलेल्या रिक्षाचे हुड व काचा फोडल्या.

दरम्यान, याविरोधात महिलेने फिर्याद दिली आहे. गारवा हॉटेल येथे कारण नसताना गालावर चपराक मारली.
तसेच पतीला तू चेअरमन असला म्हणून काय झाले़ तुला खोट्या तक्रारीत कसे फसवतो, असे बोलून धमकी दिली.
त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी घरी गेल्या असताना त्यांना  स्वत:जवळ ओढून जबरदस्तीने हात
पकडून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक पाठक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | A young man was beaten up in an argument over saying that he could not take care of his wife; A case of molestation was also registered

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Satish Kaushik Passes Away | प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन

Aurangabad ACB Trap | 50 हजार रुपये लाच घेताना भविष्य निर्वाह कार्यालयातील वेतन अधीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात