Pune Crime News | आंबेगावात तरुणाचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून

पुणे : Pune Crime News | आर्थिक व्यवहारातून वाद झाल्याने एकाने तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारुन नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून (Murder In Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पोलिसांनी खून करणार्‍यास अटक केली आहे. (Pune Crime News)

सुशांत नारायण आरुडे (वय ३०, रा. चिंतामणी अपार्टमेंट, फालेनगर, आंबेगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने राहुल बबन दांगट (वय ४६, रा. शिलाई वर्ल्डसमोर, आंबेगाव) चा खून केला. (Pune Crime News)

याबाबत विकास बबन दांगट (वय ४२, रा. आंबेगाव) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना भारती विद्यापीठच्या पाठीमागील पॉकेट कॉर्नरजवळ मध्यरात्री अडीच वाजण्यापूर्वी घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत आरुडे आणि राहुल दांगट हे एकमेकांचे मित्र आहेत.
त्यांच्यात आर्थिक व्यवहार होते. आरुडे याच्या घरी दोघे जण पहाटेपर्यंत मोबाईलवर चित्रपट पहात होते. शेजारीच कॅफे आहे. चित्रपट पहात असताना त्यांच्यात वादावादी सुरु झाली. तेव्हा कोणीतरी हा प्रकार पोलीस नियंत्रण कक्षाला कळविला. नाईट राऊंडवर असलेले पोलीस तातडीने तेथे पोहचले. तोपर्यंत आरुडे याने राहुल याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारुन नायलॉनच्या दोरीने गळा आवळला होता. पोलीस पोहचले तेव्हा राहुल दांगट हा निपचित पडलेला होता. सुशांत आरुडे हा पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी त्याला पकडले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर,
विजय पुराणिक, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

Web Title :- Pune Crime News | A young man was strangulated with a nylon rope in Ambegaon

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rapido Bike Taxi | ‘रॅपिडो’ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, बाईक, टॅक्सीसह सर्व सेवा बंद करण्याचे आदेश; रिक्षाचालकांना मोठा दिलासा

Maharashtra Government | एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! शिंदे-फडणवीस सरकारने घेतला महत्वाचा निर्णय