Pune Crime News | गोळ्या देऊन तरुणीचा केला गर्भपात; डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल, पोटात बुक्की मारुन आत्महत्या करण्याची दिली धमकी

पुणे : Pune Crime News | प्रेमसंबंध (Love Affair) निर्माण करुन जबरदस्तीने शारीरीक संबंध (Physical Relationship) निर्माण केले. त्यातून गर्भधारणा झाल्यावर गोळ्या देऊन दोनदा गर्भपात (Abortion) केला. लग्नास नकार देऊन तरुणीच्या पोटात बुक्की मारुन पोलिसात तक्रार केली तर आत्महत्या (Suicide) करेन, अशी धमकी तरुणीला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police) एका डॉक्टराविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी धनकवडीतील एका २६ वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलिसांकडे (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १३६/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी डॉ. अंकुश गुंड (रा. गणेश व्हिला, आंबेगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार आंबेगाव तसेच महाबळेश्वर येथे सप्टेबर २०२२ पासून आतापर्यंत घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉ. अंकुश गुंड याने फिर्यादी यांच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले.
त्यांच्याशी जवळीक साधून त्यांच्या इच्छेविरुद्ध शारीरीक संबंध निर्माण केले.
फिर्यादीकडून मोबाईल तसेच वेळोवेळी ६० हजार रुपये घेऊन ते परत न करता फसवणूक (Cheating Case) केली.
शारीरीक संबंधातून फिर्यादी गर्भवती राहिल्यावर डॉ. गुंड याने गोळ्या खाण्यास देऊन प्रथम गर्भपात केला.
त्यानंतर त्याने फिर्यादी यांच्याशी पुन्हा शारीरीक संबंध करुन पुन्हा गर्भवती केले.
त्यावेळी फिर्यादी यांनी लग्नाविषयी विचारल्यावर त्याने मी लग्न करणार नाही.
काय करायचे ते कर, असे म्हणून फिर्यादीच्या पोटात बुक्की मारुन तू पोलिसांमध्ये तक्रार दिल्यास
आत्महत्या करील, अशी धमकी देऊन तो पळून गेला आहे. त्यामुळे फिर्यादींनी पोलिसांकडे धाव घेतली.
पोलीस उपनिरीक्षक घोगरे तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | A young woman was aborted by giving pills; A case has been registered against the doctor, he threatened to commit suicide by punching a bookie in the stomach

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Solapur Crime News | पतीच्या मृत्यूनंतर मुलाला मोठ्या कष्टाने शिकवून इंजिनिअर बनवल्यानंतर मुलाचा अपघाती मृत्यू; महिलेचा आक्रोश

Pune Crime News | कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन करुन देण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार; फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लुबाडले सव्वा लाख रुपये

Nagpur Crime News | प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून फेसबुक पोस्ट करुन प्रियकराने संपविले जीवन