Pune Crime News | दुसर्‍या मुलासोबत प्रेयसीची जवळीक वाढल्याच्या संशयातून युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | तीन वर्षांपासून प्रेमसंबंध (Love Affair) असताना ती त्याच्याशी आता नीट बोलत नव्हती. इतर कोणासोबत तिची जवळीक वाढली असल्याचा त्याला संशय येत होता. त्यातून मानसिक त्रासातून एका १६ वर्षाच्या अल्पवयीन (Minor) मुलाने आजीच्या घरी जाऊन गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या (Suicide) केली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Pune Police) एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

जीवन कसबे (वय १६ रा. केशवनगर, मुंढवा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत त्याची आई लक्ष्मी राजू कसबे (वय ३७, रा. केशवनगर, मुंढवा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८०५/२३) दिली आहे. हा प्रकार येरवड्यातील लक्ष्मीनगर येथे १ डिसेबर दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा जीवन हा शिक्षण घेत होता. त्याचे एका मुलीबरोबर गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून ती मुलगी जीवनशी नीट बोलत नव्हती. त्यामुळे तिची इतर कोणासोबत तरी जवळीक वाढली आहे, असे जीवन यास वाटत होते. त्यातून त्याने मानसिक त्रास होऊन त्याने आजीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक जमदाडे (API Jamdade) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Bhidewada Smarak | ऐतिहासिक भिडे वाडा सरकारजमा, सोमवारी रात्री 11 वाजता कडेकोट बंदोबस्तात इमारत घेतली ताब्यात

आर्थिक देवाण घेवाणीतून खून, कोंढवा पोलीस व गुन्हे शाखेकडून 10 तासात आरोपी गजाआड

पुणे : महिलेकडे शरीर सुखाची मागणी, पिस्टलचा धाक दाखवून घरच्यांना मारण्याची धमकी

तरुणीला मारहाण करुन फोटो व्हायरल करण्याची धमकी, कर्वेनगर परिसरातील घटना

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Sindhudurg | पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण

CM Eknath Shinde On PM Modi | सिंधुदुर्गतील कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधानांचे कौतुक, ”गॅरंटीचं दुसरं नाव मोदी”