Pune Crime News | सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण, फरासखाना पोलिसांकडून मुलाची सुखरुप सुटका; दोन महिलांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कौटुंबिक वादातून सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण (Kidnapping Case) करणाऱ्या दोन महिलांना फरासखाना पोलिसांनी (Faraskhana Police) अटक केली आहे. पोलिसांनी मुलाची सुखरुप सुटका केली. नझमा बिलाल शेख (वय – 41), रेणू दिलीप राठोड (वय -41 दोघे रा. ढमढेरे बोळ, बुधवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.(Pune Crime News)

चार एप्रिल रोजी बुधवार पेठ (Budhwar Peth Pune) परिसरातून एका सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. याबाबत तक्रार प्राप्त होताच फरासखाना पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली. पोलीस कर्मचारी वैभव स्वामी, प्रवीण पासलकर, सुमीत खुट्टे, संदीप कांबळे, राकेश क्षीरसागर यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपसासाठी ताब्यात घेतले. चित्रीकरणात दोन महिला एका मुलाला रिक्षातून घेऊन जात असल्याचे दिसले.

पोलिसांनी संबंधित रिक्षा चालकाला ताब्यात घेऊन महिलांबाबत चौकशी केली.
तेव्हा दोन महिलांनी मुलाला स्वारगेट परिसरात नेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संशयित महिलांचा शोध घेतला असता महिला बुधवार पेठेत राहायला असल्याचे समजले. पोलिसांनी नझमा शेख हिला ताब्यात घेतले. तिच्याकडे सखोल चौकशी केली असता तिने साथीदार रेणू राठोड हिच्याकडे मुलाला ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी दोघींना ताब्यात घेऊन मुलाची सुटका केली. कौटुंबिक वादातून मुलाचे अपहरण केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, सहायक निरीक्षक वैभव गायकवाड, उपनिरीक्षक जयसिंग दाढे,
निलेश मोकाशी, मेहबूब मोकाशी, गोविंद गुरव, आशा कांबळे, जयश्री पवार, पूनम ओव्हाळ, मिनाझ शेख यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Crime Branch | पिंपरी : कामगारांनीच चोरले कंपनीतील इम्पोर्टेड रबरी पार्ट, गुन्हे शाखेकडून आरोपी गजाआड; पावणे सात लाखांचा मुद्देमाल जप्त

Adani Group Entry In Pune | अदानी समुहाची पुण्यातील पिंपरीमध्ये मोठी गुंतवणूक, ‘या’ उद्योगासाठी फिनोलेक्सकडून २५ एकर जमीनीची खरेदी

Pimpri Cheating Fraud Case | पिंपरी : दुकाने व सदनिकांचा ताबा न देता सव्वा तीन कोटींची फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल

Pune Lok Sabha Election 2024 | सोशल मीडिया आणि भेटीगाठींवर भर देत मुरलीधर मोहोळांचा जोरदार प्रचार, म्हणाले -”पुण्याला देशातील सर्वोत्कृष्ट…”