लुटमार करणार्‍यांचे धाडस वाढले, धक्कामारून मोबाईल हिसकावले

पुुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात लुटमार तसेच पादचार्‍यांचे मोबाईल व त्यांच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावणार्‍या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहेच, पण त्यांचे धाडसही वाढत चालले असून, चंदननगर परिसरात महिलेला अन अल्पवयीन मुलाला धक्का देऊन हातातील मोबाईल हिसाकवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. एकीकडे पोलिसांचे अपयश अन चोरट्यांची चोक कामगिरी मात्र, पुणेकरांच्या खिशाला कात्री लावत आहे.

याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरील चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या केशवनगर मुंढवा परिसरात राहण्यास आहेत. कामानिमित्त खराडी परिसरात आल्या होत्या. त्या पायी चालत डाऊन टाऊन लंगस्टन सोसायटी समोरून जात असताना अचानक समोरून दुचाकीवर दोघेजन आले. त्यांनी फिर्यादींना समोरून धक्का मारला. त्या गडबडल्यानंतर हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकामारून चोरून नेला. त्याचवेळी अशाच प्रकारे 16 वर्षीय अमल मॅथ्यु याचाही मोबाईल अशाच प्रकारे हिसकावून नेला आहे.

शहरात लुटमार, चोर्‍या, सोन साखळी तसेच घरफोड्या करणार्‍या चोरट्यांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पण, काही केल्या पोलिसांना हे चोरटे सापडत नसल्याचे चित्र आहे. चोरट्यांच्या अन पोलिसांच्या मध्ये मात्र पुणेकरांची दैना उडाली असून, शहर दहशतीखाली असल्याचे दिसत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?