चोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील बस स्थानक आणि पीएमपीएलच्या गाड्या तसेच बस स्टॉप सध्या चोरट्यांचे हक्काचे ठिकाण बनले असून, दररोज चोरटे प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारत आहेत. पण, पोलीस मात्र, या घटना गांभिर्याने घेत नसल्याचेच दिसत आहे. पुन्हा दोन घटनांत साडे सहा लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. स्वारगेट आणि बंडगार्डन परिसरात या घटना घडल्या आहेत.

पहिली घटना स्वारगेट येथे घडली असून, याप्रकरणी 58 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात फिर्यादी या धायरीला जाण्यासाठी स्वारगेट येथिल बस स्टॉपवर थांबल्या होत्या. बस आल्यानंतर त्या बसमध्ये चढत असताना पर्समधील 1 लाख रुपयांच्या दागिने चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेले आहेत.

तर, दुसरी घटना बंडगार्डन परिसरात घडली आहे. याप्रकरणी एका 53 वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तळेगाव ढमढेरे परिसरातील रहिवाशी असून शिक्रापूर येथील एका खासगी कंपनीत कामाला आहे. त्यांनी काही दिवसांपुर्वी पुणे स्टेशन परिसरात राहणार्‍या नातेवाईकांकडून हात उसने पैसे घेतले होते. हे पैसे परत देण्यासाठी महिला शिक्रापूर ते पुणे स्टेशन असा पीएमपीएल प्रवास करीत होती. त्यावेळी बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या पर्समधून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने मिळून साडेपाच लाखांचा ऐवज चोरुन नेला. अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like