पुण्यात प्रवासादरम्यान दागिने चोरणार्‍यांची टोळी पुन्हा ‘अ‍ॅक्टिव्ह’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पीएमपीएल प्रवासात चोर्‍या करणार्‍या टोळ्यांनी अक्षरश: शहरात हैदोस घातला आहे. पण, रंगरंगोटी, वेगवेगळे कार्यक्रम अन वाहतूक सुरळीत करण्यात मग्न असणार्‍या ढिम्म पोलिसामुळे आता पुणेकरांनीच या टोळ्यांचा बंदोबस्त करावा लागेल अशीच परिस्थिती पाहिला मिळत आहे. शहरात पीएमपीएल प्रवासत महिलांचे दागिने चोरीच्या गेल्या काही महिन्यात तब्बल 35 हून अधिक घटना घडल्या आहेत. पण, पोलिसांना याकडे पाहिला वेळ नसल्याचे दिसत आहे.

नुकतीच विश्रामबाग परिसरात पीएमएलने प्रवास करणार्‍या ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याची 40 हजार रुपयांची बांगडी चोरट्यांनी पळविल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी 79 महिलेने पोलीसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासनाचे 1300 सीसीटीव्हीं अन आता पोलिसांनी पुणेकरांत जनजागृती करून पोलीसांच्या कक्षेत सामावून घेतलेले 35 हजाराहून अधिक सीसीटीव्ही यामुळे शहर पोलीसांच्या नजरेखाली आल्याचे मानले जाते. शासनाच्या सीसीटीव्हीमधून मात्र, पोलीसांनी पुणेकरांवर दंड करत चोक कामगिरी पार पाडली आहे. दररोज काही शेकड्यांमध्ये वाहतूक पोलीस यामाध्यमातून कारवाई करत आहेत. त्यासोबतच एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करतात. त्यात घटना तसेच आरोपी कैद झाल्यानंतर त्यांचा माग काढून पकडण्यात येते. हजारों घटनांमधून पोलीस शेकडो गुन्ह्यांची उकल यातून करत आहेत. पण, या परिस्थितीतही मात्र, पोलीसांना काही ठरावीक गुन्ह्यातील टोळ्या अन चोरटे सापडत नसल्याचे पाहिला मिळत आहे.

शहरात घरफोड्या अन सोन साखळी चोरट्यांसोबतच गेल्या काहीं महिन्यांमध्ये पीएमपीएल प्रवाशांच्या किंमती ऐवज चोरणार्‍या टोळ्यांनी धुडगूस घातला आहे. केवळ दोन ते अडीच महिन्यात शहरात 35 हून अधिक घटना घडल्या आहेत. पण, त्यातील चोरटे मात्र पोलिसांना हाती लागत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे गुन्हे शाखा साध्या वेशातील पथके नेमले असल्याचा डांगोरा पिटत आहेत. पण, त्या साध्या वेशातील पोलिसांनाही हे चोरटे मेळ लागू देत नसल्याचे दिसत आहे.

त्यामुळे आता पुणेकर आम्हीच पुढाकार घेऊन या टोळीला पकडावे का, अशी विचारणा करत आहेत. असे झाल्यास मात्र, पोलिसांची लक्तरे वेशीला टांगली जातील हेही तितकेच खरे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?