Pune Crime News | 2 कोटींना गंडा घालून दुबईला फरार; बेस्ट पॉईंट इम्पॅक्ट जनरल ट्रेडिंग कंपनीचे कार्यालय केले बंद, सांगलीच्या विक्रांत पाटील आणि संतोषकुमार गायकवाड यांच्यावर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला गुंतवणुक (Investment) करायला लावून त्याची तब्बल २ कोटींची फसवणूक (Cheating Case) करुन कार्यालय बंद करुन संचालक दुबईला पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

याप्रकरणी शिवणे येथील एका महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५०/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विक्रांत रमेश पाटील Vikrant Ramesh Patil (वय २५, रा. मोराळे (राजापूर), पलूस, सांगली), संतोषकुमार विष्णु गायकवाड Santosh Kumar Vishnu Gaikwad (रा. बलवडी, ता. खानापूर, सांगली) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार प्रभात रोडवरील कार्यालयात २० ते २७ ऑगस्ट २०२१ दरम्यान घडला होता.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीची व्यावसायिक स्थिती चांगली असल्याचे पाहून संतोषकुमार गायकवाड याने त्यांच्याशी मैत्री केली. आपला फॉरेक्स, ट्रेडिंग व क्रिप्टो करन्सीचा व्यवसाय असून बेस्ट पॉईट इम्पॅक्ट जनरल ट्रेडिंग (Best Point Impact General Trading) नावाने कंपनी असल्याचे सांगितले. कंपनीचे प्रभात रोडवर कार्यालय असल्याचे सांगितले. त्याच्या आग्रहामुळे तसेच इतर लोकांना दरमहा ५ ते ६ टक्क्यांपर्यंत परतावा मिळाल्याचे त्याने दाखविल्यावर फिर्यादी यांनी त्यांच्याकडे सुरुवातीला १ कोटी रुपयांची गुंतवणुक केली. त्यानंतर २४ ऑगस्ट २०२१ ला ८० लाख रुपये रोख दिले. संतोषकुमार गायकवाड याने समजुतीचा करारनामा करुन दिला. मार्च २०२२ मध्ये तुम्हाला देण्यात येणार्‍या नफ्याच्या रक्कमेचा आपण संपूर्ण हिशेब करुन ती ६ टक्के दराने येणारी रक्कम तुम्हाला देण्यात येईल. तुम्ही आणखी दुसरी गुंतवणूक सुरु करा म्हणजे मार्च महिन्यात तुमचा आणखी फायदा होईल, असे सांगितले. त्यानंतर तो दुबईला गेला. मार्च २०२२ च्या पहिल्या आठवड्यात संतोषकुमार गायकवाड पुण्यात आला. (Pune Crime News)

त्याने फिर्यादी यांच्या परताव्याच्या रक्कमेचा हिशेब करुन तुम्हाला अंदाजे ५० लाख रुपये मिळणार असे सांगितले. त्यानंतर आणखी २० लाख रुपये द्या म्हणजे तुमची गुंतवणुक अडीच कोटी रुपये होईल, असे सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी आणखी २० लाख रुपये रोख प्रभात रोडच्या कार्यालयात नेऊन दिले. त्यानंतर तो अचानक दुबईला निघून गेला. फिर्यादीच्या पतीने अनेकदा फोन केले. तेव्हा त्याने आज देतो, उद्या देतो, असे सांगून टाळाटाळ केली. प्रभात रोडवरील कार्यालय सुद्धा बंद केले. पुण्यात परत आलो की पैसे देतो, असे सांगून त्यांना झुलवत राहिला. नंतर त्यांचे फोनही घेणे बंद केले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी तक्रार अर्ज केला होता.
त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावंकर तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | Absconded to Dubai after defrauding 2 crores;
Office of Best Point Impact General Trading Company closed, case against Sangli’s
Vikrant Patil and Santoshkumar Gaikwad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा