Pune Crime News | पुण्यातील कोंढवा-एनआयबीएम रोडवर अपघात; लस घेण्यास निघालेल्या 19 वर्षीय तरूणीचा मृत्यू

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  कोंढवा-एनआयबीएम रस्त्यावर (kondhwa nibm road) झालेल्या विचित्र अपघातात (strange accident) वैद्यकीय शिक्षण (Medical education) घेणाऱ्या विद्यार्थींनीचा मृत्यू झाला आहे. तिच्या अंगावरून कार गेल्याने तिचा मृत्यू झाला (Pune Crime News) . ती मित्रासोबत कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी जात होती. मंगळवारी दुपारी ही घटना घडली आहे. Pune Crime News | Accident on Kondhwa-NIBM Road in Pune; 19-year-old girl dies

Join our Whatapp groupTelegramfacebook page and Twitter for every update

गायत्री इथापे (वय 19, रा. वाई, जि. सातारा) Gayatri Ithape असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी स्ट्रोम कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तिचा मित्र प्रथमेश मांढरे (वय 20) Prathamesh Mandhare याने कोंढवा पोलीस ठाण्यात (kondhwa police station) तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्री ही पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात फिजिओथेरपीचे शिक्षण (Education of physiotherapy) घेत होती.
ती गर्ल्स हॉस्टेलला (girls hostel) मैत्रिणीसोबत राहत होती.
यादरम्यान तिचा मित्र प्रथमेश मांढरे (Prathamesh Mandhare) व ती मंगळवारी दुपारी दुचाकीवर लस घेण्यास मुंढवा (Mundhwa) येथे जात होते. प्रथमेश दुचाकी चालवत होता.
एनआयबीएम (Nibm Road) मार्गाने मुंढवा (Mundhwa) येथे जात असताना एनआयबीएम चौकाच्या (Nibm Chowk) अलीकडे समोर अचानक रिक्षा आला.
यामुळे प्रथमेश याने ब्रेक दाबले. त्यामुळे दुचाकीवरचे कंट्रोल सुटल्याने त्यांची दुचाकी स्लिप होऊन ते खाली कोसळले. यावेळी गायत्री इथापे (Gayatri Ithape) ही काही अंतरावर जाऊन पडली.
याचवेळी पाठीमागून उंड्रीच्या दिशेने जात असलेल्या भरधाव स्कोम कार तिच्या अंगावरून गेल्याने ती गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला.
या अपघाताने गायत्री हिच्या कुटुंबावर व मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.
अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बर्गे (Assistant Police Inspector Deepak Barge) हे करत आहेत.

Web Title : Pune Crime News | Accident on Kondhwa-NIBM Road in Pune; 19-year-old girl dies

Join our Whatapp groupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime News | पाय घसरून लिफ्टच्या डक्टमध्ये पडून एकाचा दुर्दैवी मृत्यू