Pune Crime News | धावत्या रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू, तळेगाव मधील घटना

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे-मुंबई लोहमार्गावर (Accident On Pune Mumbai Lohamarg) एका रेल्वे गाडीतून पडून एका इसमाचा मृत्यू झाला आहे. विद्याधर विजयकुमार इनामदार Vidyadhar Vijayakumar Inamdar (वय ४८ रा. राव कॉलनी, तळेगाव दाभाडे) असे मयत इसमाचे नाव आहे. (Pune Crime News)

 

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई लोहमार्गावर तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) व वडगावच्या (Vadgaon Maval) दरम्यान एमआयडीसी रोडच्या (MIDC Road) पुलालगत रेल्वे किलोमीटर क्रमांक १५५/५१ जवळ सोमवारी ( दि.१२) सायंकाळी ४:३० च्या सुमारास रेल्वे गाडीतून पडून विद्याधर इनामदार गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

विद्याधर इनामदार हे जेष्ठ पत्रकर विवेक इनामदार (Senior Journalist Vivek Inamdar) यांचे बांधू होते. त्यांच्या पश्चात आई, वडील,
पत्नी, दोन मुली, भाऊ, भावजय, भाच्या आसा परिवार आहे. विद्याधर इनामदार यांच्या मृत्यूमुळे कुटुंबासह मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.
याप्रकरणी पुढील तपास रेल्वे पोलीस (Pune Railway Police) संजय तोडमल करीत आहेत (Lohamarg Police Pune).

 

Web Title :  Pune Crime News | Accident Pune Mumbai Lohamarg Death Of
Vidyadhar Vijayakumar Inamdar Brother Of Journalist Vivek Inamdar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा