Pune Crime News | मायकार अ‍ॅपवरून कार भाड्याने घेऊन फरार झालेल्या आरोपींना विमानतळ पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मायकार अ‍ॅपवरील (My Car App) मोबाईल नंबरवर संपर्क करुन इनोव्हा क्रिस्टा (Innova Crysta) गाडी भाड्याने घेऊन गाडीसह फरार झालेल्या टोळीला विमानतळ पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. पोलिसांनी सहा जणांना शिरुर, शिक्रापूर, नाशिक आणि नागपूर येथून अटक केली. त्यांच्याकडून इनोव्हा क्रिस्टा गाडी जप्त केली आहे. (Pune Crime News) याबाबत टुरिस्ट व्यावसायिक निलेश रोहीदास निंबाळकर (Nilesh Rohidas Nimbalkar) यांनी  विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) तक्रार दिली होती.

 

रोहित संदीप दरेकर, आकाश रावसाहेब पोटघन उर्फ भडंगे, गणेश रामलाल माळी, सौरभ विक्रम हावळे, मृणाल प्रकाश सोरदे, राकेश देवेंद्र पवार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.  फिर्यादी निलेश निंबाळकर यांचा टुरिस्टचा व्यवसाय (Tourist Business) आहे. त्यांनी आरोपी रोहित दरेकर याला 9 दिवसांसाठी इनोव्हा क्रिस्टा गाडी भाड्याने दिली होती. गाडी भाड्याने घेण्यासाठी रोहित दरेकर याने चाकण येथुन चोरी केलेल्या इको गाडीतील आधार कार्ड (Aadhaar Card), पॅनकार्ड (PAN Card), चेकबुकचा वापर केला होता. गाडी ताब्यात घेतल्यानंतर आरोपी फरार झाला होता. (Pune Crime News)

 

विमानतळ पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलचे सीडीआर प्राप्त करुन तांत्रिक विश्लेष करुन रोहित दरेकर याला शिरुर येथून अटक केली. आरोपीची पोलीस कस्टडी घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली चौकशी दरम्यान हा गुन्हा त्याचे साथिदार आकाश पोटघन, गणेश माळी आणि सौरभ हावळे यांच्या मदतीने केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना शिक्रापुर आणि नाशिक परिसरातून अटक केली.

 

आरोपींकडे केलेल्या चौकशी त्यांनी गाडी विक्री करण्यासाठी मृणाल सोरदे, राकेश पवार यांच्याकडे दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार विमानतळ पोलीस ठाण्यातील एक पथक नागपूर येथे रवाना करण्यात आले. पथकाने आरोपींचा नागपूर येथे शोध घेऊन त्यांना गाडीसह ताब्यात घेतले. आरोपी रोहित दरेकर, आकाश पोटघन यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) वाहन चोरीचा गुन्हा दाखल आहे. तर आकाश पोटघन हा अकलुज पोलीस ठाण्यात (Akluj Police Station) दाखल असलेल्या फसवणूकीच्या गुन्ह्यात फरार आरोपी आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा (Addl CP Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ -4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borat),
सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishore Jadhav)

Advt.

यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे
(Senior PI Vilas Sonde), पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता माळी (PI Sangeeta Mali),
सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन (API Vijay Chandan),
पोलीस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे (PSI Ravindra Dhavre), पोलीस अंमलदार अविनाश शेवाळे,
अंकुश जोगदंडे, गिरीश नाणेकर, दादासाहेब बर्डे, रुपेश पिसाळ, नाना कर्चे, सचिन जाधव,
सचिन कदम, योगेश थोपटे, ज्ञानेश्वर आवारी यांच्या पथकाने केली.

 

Web Title :  Pune Crime News | Accused absconding by renting a car from MyCar app arrested by
Viman Nagar Police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा