Pune Crime News | समृद्ध जीवन घोटाळ्यातील 7 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला सीआयडी कडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | देशभरताली गुंतवणुकदारांची पाच हजार कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या समृद्ध जीवन घोटाळ्यातील (Samruddha Jeevan Scam) फरार आरोपीला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (Crime Investigation Department (CID Maharashtra) अटक केली आहे. आरोपी सात वर्षापासून सीआयडीला हुलकावणी देत होता. अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई बुधवारी (दि.6) पुणे-सातारा रोडवर (Pune-Satara Road) असलेल्या सिटीप्राईड सिनेमागृहाजवळ करण्यात आली. रामलिंग हिंगे Ramling Hinge (वय-56 रा. गल्ली नं. 3 गोकुळनगर, कात्रज) असे अटक (Arrest) केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Crime News)

समृद्ध जीवन समूहाचा सर्वेसर्वा गुन्ह्यातील मुख्य आरोपी महेश मोतेवार (Mahesh Motewar) याच्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) 2016 साली आयपीसी 403, 406, 409, 120ब, 34 आणि महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण अधिनियम सन 1999 चे कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी रामलिंग हिंगे हा महेश मोतेवार याच्या जवळचा साथीदार आहे. (Pune Crime News)

समृद्ध जीवन फुड्स इंडिया (Samruddha Jeevan Foods) व समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टी पर्पज को ऑप सोसायटीचा (Samruddha Jeevan Multi State Multi Purpose Co-op Society) सर्वेसर्वा महेश मोतेवार व रामलिंग हिंगे यांनी महाराष्ट्रात व संपूर्ण देशभरात कंपनीच्या अनेक शाखा उघडल्या. त्या माध्यमातून गुंतवणुकदारांची 4 हजार 725 कोटी रुपयांची फसवणूक (Fraud) केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हिंगे हा फरार झाला होता. मागिल 7 वर्षांपासून तो पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी ओळख लपवून राहत असल्याने मिळून येत नव्हता. रामलिंग हिंगे हा सातारा रोडवरील सिटी प्राईड येथे येणार असल्याची माहिती सीआयडी पथकाला मिळाली. त्यांनी हिंगे याला सापळा रचून ताब्यात घेतले.

समृद्ध जीवन समूहाविरुद्ध भारतभरात एकूण 26 गुन्हे दाखल आहेत. संपूर्ण भारतातील 64 लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदारांची व महाराष्ट्रातील एकूण 18 लाख गुंतवणुकदारांची फसवणूक करण्यात आली आहे. या गुन्ह्यांतील एकूण 25 आरोपींपैकी महेश मोतेवारसह 16 जणांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र (Charge Sheet) सादर करण्यात आले आहे.

ही कामगिरी अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे (Addl DGP Prashant Burd) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच
विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपूरे (Special IGP Sanjay Yenpure), पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले
(SP Manisha Dubule), अपर पोलीस अधीक्षक तृप्ती जाधव (Addl SP Tripti Jadhav) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक आनंद रावडे (PI Anand Rawde), हवालदार सुनिल बनसोडे, प्रदीप चव्हाण, कोळी यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मनसे पदाधिकाऱ्याकडे खंडणीची मागणी, दोन माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; धायरीतील प्रकार

व्यावसायिकाची 7 लाखांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून आरोपीला अटक

Malaika Arora Viral Photos | ऑल व्हाईट आउटिंग लुकमध्ये मलाइका अरोराने वेधलं चाहत्यांच लक्ष, पाहा व्हायरल फोटो…