Pune Crime News | पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मोक्कातील आरोपी पसार; प्रचंड खळबळ

0
1220
Pune Crime News | Accused in MCOCA (Mokka) escape by giving trumpet to Pune police; Huge excitement Market Yard Police
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | मार्केटयार्डमध्ये (Market Yard Pune) पिस्तुलाचा धाक दाखवून २८ लाख रुपये लुटून नेणार्‍या टोळीवर पोलीस आयुक्त रितेशकुमार (CP Retesh Kumaarr) यांनी नुकतीच मोक्काची कारवाई (MCOCA (Mokka Action) केली होती. या टोळीतील एक जण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. (Pune Crime News)

संतोष बाळु पवार Santosh Balu Pawar (वय २३, रा. पानशेत रोड, खानापूर, ता. हवेली) असे त्याचे नाव आहे. मार्केटयार्ड परिसरात दिवसाढवळ्या पिस्तुलाचा धाक दाखवून २८ लाख रुपयांचा दरोडा अविनाश रामप्रताप गुप्ता Avinash Rampratap Gupta व त्याच्या टोळीने टाकला होता. १२ नोव्हेबर रोजी अंगडियाच्या कार्यालयात जाऊन त्यांनी हा दरोडा टाकला होता. पोलिसांनी या टोळीला पकडले आहे. (Pune Crime News)

अविनाश गुप्ता टोळीने अवैध मार्गाने धमकी देऊन, जुलुम जबरदस्ती करणे, खूनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे असे अनेक गंभीर गुन्हे केल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे यांनी या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव दिला होता. तो मंजूर करण्यात आला होता. हे सर्व जण पोलीस कोठडीत असताना त्यातील संतोष पवार हा बुधवारी सायंकाळी पोलिसांची नजर चुकवून पळून गेला. मार्केटयार्ड पोलीस (Market Yard Police) त्याचा शोध घेत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Accused in MCOCA (Mokka) escape by giving trumpet
to Pune police; Huge excitement Market Yard Police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Chinchwad Bypoll Elections | अजित पवारांनी मुलाखत घेण्याआधीच राष्ट्रवादीच्या नेत्याने विकत घेतले नामिर्देश पत्र, राजकीय चर्चांना उधाण

Pune Crime News | बलात्काराची तक्रार दिल्याने तरुणाचा अल्पवयीन युवतीच्या घरासमोर धिंगाणा; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात FIR

Kunal Shailesh Tilak | कसबा पोटनिवडणुकीत तिकीट मिळवून देण्याचे आमिष दाखवून कुणाल टिळकांच्या फसवणुकीचा प्रयत्न

Budget 2023 | केंद्रीय अर्थसंकल्पावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका; म्हणाले

Pune RTO Office | पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 57 वाहनांचा जाहीर ई-लिलाव

Rajendra Bathiya On Budget 2023 | व्यापार्‍यांच्या दृष्टीने समाधानकारक अर्थसंकल्प – दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया