Pune Crime News | सेक्सटॉर्शनमधील आरोपीला राजस्थानमधून अटक, सहकारनगर पोलिसांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग व व्हिडिओ कॉलींग करुन तरुणाचा न्युड व्हिडिओ (Nude Videos) बनवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी (Threat) देऊन पैसे घेतले. त्यानंतर देखील त्याला मानसिक त्रास दिल्याने त्याने आत्महत्या (Suicide) केली. सेक्सटॉर्शन प्रकरणातील (Sextortion Case) आरोपीला सहकारनगर पोलिसांनी राजस्थानमधून (Pune Crime News) अटक केली आहे. ही घटना 30 सप्टेंबर 2022 रोजी घडली होती.

 

आरोपींनी मयत मुलाला त्याचा न्युड व्हिडिओ बनवुन तो फेसबुक, इन्स्टाग्राम, मॅसेंजर, ट्विटर, युट्युब चॅनेलवर अपलोड करण्याची धमकी दिली. तसेच त्याच्याकडून वेळोवेळी 4500 रुपये जबरदस्तीने फोन पेवर घेतले. त्यानंतर वारंवार त्याला व्हिडिओ शेअर करण्याची धमकी आरोपींनी दिली. आरोपीच्या मानसिक त्रासाला वैतागून तरुणाने आत्महत्या केली. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) आयपीसी 306, 384 व आयटी अ‍ॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.(Pune Crime News)

या गुन्ह्यात वापरलेल्या मोबाईलचा तांत्रीक विश्लेषण करुन आरोपचीच्या राहत्या घराच्या ठिकाणीची माहिती पोलिसांनी मिळवली. त्यानुसार सहकारनगर पोलीस ठाण्यातील एक पथक राजस्थान (Rajasthan) येथील सिकरी तालुक्यातील रायपुर सुकेती येथे रवाना झाले. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने सलग आठ दिवस रेकी करुन आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला शिवाजीनगर न्यायालयात हजर करुन त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेतली आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil),
सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर (Senior Police Inspector Savalaram Salgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी (PSI Hasan Mulani), पोलीस अंमलदार संजय गायकवाड,
सागर सुतकर, निखील राजीवडे, सागर कुंभार यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | Accused in sextortion arrested from Rajasthan, Sahkarnagar police action

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | धक्कादायक ! पुण्यात रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने सपासप वार, पोलीस गंभीर जखमी

Mouni Roy | मौनी रॉयच्या योगा पोजेसमधील फोटोजने वेधले सर्वांचे लक्ष; फोटोत दिसत आहे खूपच बोल्ड

Sonalee Kulkarni | अभिनेत्री सोनाली कुलकर्णी काळ्या रंगातील साडीत दिसत आहे एकदम कडक