Pune Crime News | सेक्‍सटॉर्शन प्रकरणातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | राजस्थान येथील अन्वर खान ऊर्फ सुबानखान (वय 29) याच्यावर सेक्सटॉर्शनचा (Sextortion) शहरातील पहिला गुन्हा (FIR) दाखल झाला होता. सेक्‍सटॉर्शन बाबत आमदार सुनील प्रभू (MLA Sunil Prabhu) यांनी हिवाळी अधिवेशनात (Winter Session) सरकारला तारांकित प्रश्न विचारले होते. या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक (District and Sessions Judge Sunil Vedpathak) यांनी जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे. अशी माहिती अॅड. राकेश सोनार (Adv. Rakesh Sonar) यांनी दिली. (Pune Crime News)

आरोपी अन्वर खान याने अ‍ॅड. राकेश सोनार यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. 19 वर्षीय तरुणाच्या आत्महत्या प्रकरणात (Suicide Case) दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) अनोळखी व्यक्तीने तरुणाला त्याचे अर्धनग्न फोटो पाठविले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन फोन पेद्वारे साडेचार हजार रुपये घेतले. अधिक पैसे मागितल्याने आणि अर्धनग्न फोटो व्हायरल केल्याने त्याने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (Pune Crime News)

या प्रकरणात कोणताही तांत्रिक पुरावा नाही, किंवा आरोपी मयत व्यक्तीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केला असा कोणातही पुरावा कोर्टा समोर पोलिसांनी (Pune Police) हजर केलेला नाही. ऐकीव माहितीवर गुन्हा दाखल झाला आहे. एफआयआरमध्ये त्याचे नाव देखील नाही. आरोपीला खोट्या गुन्ह्यात अडकाविल्याचा युक्तीवाद अ‍ॅड. राकेश सोनार यांनी न्यायालयात केला.

अ‍ॅड. सोनार यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीला अटी व शर्तीवर तसेच 40 हजार
रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. अ‍ॅड. राकेश सोनार यांना अ‍ॅड. महेश देशमुख
(Adv. Mahesh Deshmukh), अ‍ॅड.योगीराज स्वामी (Adv.Yogiraj Swamy),
अ‍ॅड. प्रशांत कांबळे (Adv. Prashant Kamble), अ‍ॅड. प्रमोद राठोड (Adv. Pramod Rathod) यांनी सहकार्य केले.

Web Title :- Pune Crime News | Accused in sextortion case granted bail by District and Sessions Court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Double Murder Case | पुण्यातील दुहेरी हत्याकांडाचे गूढ उकललं, आईवरील अत्याचाराचा बदला घेण्यासाठी UPSC करणाऱ्याने दाम्पत्याला संपवलं

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | ‘घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला केवळ खुर्च्यांची गर्दी’, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Ajit Pawar | आपल्याला बदला घ्यायचा आहे, पोटनिवडणूकीच्या जाहीर सभेत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी