Pune Crime News | पत्नीवर वार करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सोन्याचे नेकलेस (Gold Necklace) बुक करण्यासाठी दिलेल्या पैशांबाबत विचारणा केल्याच्या रागातून पतीने पत्नीवर कोयत्याने वार (Stabbing) करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. ही घटना (Pune Crime News) पुण्यातील धायरी येथे घडली होती. या प्रकरणातील आरोपी पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.ए. रामटेके यांनी जामीन मंजूर केला असल्याची माहिती आरोपींचे वकील अ‍ॅड. तन्मय देव (Adv.Tanmay S Deo) यांनी दिली.

 

याबाबत पत्नीने सिंहगड पोलीस ठाण्यात (Sinhagad Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आनंद मसाजी वाघमारे Anand Masaji Waghmare (वय-37 रा. धायरी) याच्यावर आयपीसी 307, 325, 504, 506 सह आर्म अ‍ॅक्टनुसार (Arm Act) गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली होती. (Pune Crime News)

जामीन मिळावा यासाठी आरोपीने अ‍ॅड. देव यांच्या मार्फत अर्ज केला होता. या अर्जावर झालेल्या सुनावणी दरम्यान वकिलांनी युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितले की, पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त केले आहे. पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून पोलिसांना याप्रकरणात आता काहीही जप्त करायचे नाही. तसेच हा प्रकार घरगुती वादातून झाला आहे. फिर्यादी यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी आरोपीच्या हाताचा चावा घेतल्यानंतर कोयत्याने वार केला. याशिवाय तक्रारदार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे आरोपीला तुरुंगात ठेवण्यात काहीच कारण नाही. अॅड. देव यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीचा अटीशर्तींवर जामीन मंजूर केला.

 

न्यायालयाने आरोपीचा 15 हजार रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
तसेच आरोपीने महिन्याच्या पहिल्या शनिवारी सकाळी 11 ते दुपारी 1 यावेळेत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात हजेरी लावावी.
जामीनावर सुटल्यावर तक्रारदार अथवा सरकारी साक्षीदारांशी संपर्क करु नये या अटींवर आरोपीला जामीन मंजूर केल्याचे
अ‍ॅड. देव यांनी सांगितले. या प्रकरणात अ‍ॅड. तन्मय देव, यांना अ‍ॅड. प्रसाद निकम (Adv. Prasad Nikam)
अ‍ॅड. मन्सूर तांबोळी (Adv.Mansoor Tamboli) आणि अ‍ॅड. शुभम बोबडे (Adv.Shubham Bobade) यांनी सहकार्य केले.

 

 

Web Title :- Pune Crime News | Accused who assaulted wife granted bail by Additional Sessions Court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Chinchwad Bypoll Election Results | 37 फेऱ्यांनतर ठरणार चिंचवडचा भावी ‘आमदार’, मतमोजणीला लागणार 14 तास

SSC Exam | ऑल द बेस्ट! उद्यापासून 10 वीची परीक्षा सुरु, राज्यात 15 लाख 77 हजार विद्यार्थी देणार परीक्षा

Ajit Pawar | ‘आशिष शेलारांच्या मताशी मी सहमत, त्यांना समज दिली पाहिजे’, संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितले