पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | फसवणुकीच्या (Fraud) गुन्ह्यात 12 वर्षे फरार असलेल्या आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक एकने (Anti Narcotics Cell) कोल्हापूर येथून अटक केली आहे. आरोपीवर 2011 मध्ये लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून आरोपी फरार होता. पोलीस त्याच्या मागावर होते मात्र तो सापडत नव्हता. अखेर त्याला अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले. (Pune Crime News)
अशोक गुराप्पा वैद्दु Ashok Gurappa Vaidhu (वय-53 रा. गल्ली नं.9, राजीव गांधी नगर, जयसिंगपूर, जि. कोल्हापूर) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. लष्कर पोलीस ठाण्यात 2011 मध्ये दाखल करण्यात आलेल्या आयपीसी 420, 34 गुन्ह्यातील फरार आरोपी अशोक वैद्दु हा त्याच्या जयसिंगपूर (Jaisingpur) येथील घरी असल्याची माहिती पोलीस अंमलदार मारुती पारधी (Maruti Pardhi) यांना समजली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने कोल्हापूर येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी आरोपीला लष्कर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुनिल पवार (ACP Sunil Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Senior PI Vinayak Gaikwad),
सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengle), पोलीस अंमलदार मारुती पारधी,
मनोजकुमार साळुंके, विशाल दळवी, राहुल जोशी यांच्या पथकाने केली.
Web Title :- Pune Crime News | Accused who has been absconding for 12 years in the crime of fraud has been arrested by the crime branch
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
All India Bank Employees Association (AIBEA) | मोदी सरकार कामगार संघटनांविरोधात – सी. एच. व्यंकटचलम्