Pune Crime News | झोन – 2 मधील स्वारगेट, सहकारनगर, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 9 सराईत गुन्हेगार तडीपार

0
327
Pune Crime News | Action on 9 criminals Swargate, Sahakarnagar, Bharti Vidyapeeth police station area in Zone-2
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे पोलीस आयुक्तालयातील (Pune Police Commissionerate) परिमंडळ दोनच्या हद्दीतील स्वारगेट, सहकारनगर आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील 9 सराईत गुन्हेगारांना तडीपार (Tadipaar) करण्यात आले आहे. ही कारवाई शनिवारी (दि.4) करण्यात आली आहे. दरम्यान गुरुवारी परिमंडळ 4 मधील तब्बल 14 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर परिमंडळ 2 मधील गुन्हेगारांवर कारवाई केल्याने पोलिसांचा गुन्हेगारांवर (Pune Crime News) वचक निर्माण झाला आहे.

परिमंडळ दोन मधील पोलीस ठाण्यातील खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), दंगा, दुखापत, जबरी चोरी, घरफोडी (Burglary), चोरी (Theft), बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, अवैध दारु विक्री करणे, अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कायद्याचा वचक रहावा यासाठी संबंधित पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तडीपारीचे प्रस्ताव पाठवले होते. तडीपारीच्या प्रस्तवाची पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil) यांनी चौकशी करुन 9 गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम (Maharashtra Police Act) 56 प्रमाणे कारवाई केली आहे. 9 गुन्हेगारांना पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड आयुक्तालय (Pimpri Chinchwad Commissionerate) आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Pune Crime News)

स्वारगेट पोलीस ठाण्याच्या (Swargate Police Station) हद्दीतील हिऱ्या उर्फ अजिज सलामत शेख (रा. गुलटेकडी), शंकर नागप्पा निकले (वय-32 रा. समाज मंदिराजवळ, गुलटेकडी), रोशन मिठ्ठु घोरपडे (वय-19 रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी) याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) गंभीर गुन्हे दाखल असलेल्या महेश अनिल साळुंखे (वय-25 रा. धनकवडी), शुभम सिताराम शिंदे (वय-20 रा. प्रभात चौक, धनकवडी) यांना तडीपार करण्यात आले आहे.

तसेच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (Bharti Vidhyapeeth Police Station) हद्दीतील
विशाल बालाजी सोमवंशी (वय-21 रा. जांभुळवाडी रोड, आंबेगाव खु), सुजित दत्तात्रय पवार (वय-20 रा. श्रीनाथ चाळ, आंबेगार खु), आकाश रविंद्र उणेचा (वय-20 रा. न्यु डॉन शाळेजवळ, कोंढवा खु), सुजित सुरेश सरपाले (वय-26 रा. अंजनीनगर, कात्रज) यांच्यावर तडीपारीची कारवाई केली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे
(Addl CP Rajendra Dahale) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या पुढील काळात देखील सराईत गुन्हेगारांवर अशाच प्रकारची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title :- Pune Crime News | Action on 9 criminals Swargate, Sahakarnagar, Bharti Vidyapeeth police station area in Zone-2

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे पोलिसांची सलग दुसऱ्या दिवशी गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई ! खडक, भारती विद्यापीठ, सहकारनगर, अलंकार, उत्तमनगर, दत्तवाडी, वानवडी, हडपसर, कोंढवा, लोणी काळभोर परीसरात गुटखा विक्री करणाऱ्या 11 जणांना अटक

Kolhapur Crime News | दुर्दैवी ! खेळत असताना पिठात पडल्यामुळे नाकातोंडात पीठ जाऊन 9 महिन्यांच्या बालकाचा अंत

Nawazuddin Siddiqui | अभिनेता नवाजुद्दीनच्या अडचणींमध्ये वाढ; पत्नीच्या आरोपांनंतर कोर्टाने बजावली नोटीस