Pune Crime News | पुण्यातील पोलिस उपनिरीक्षक शशिकांत पवार निलंबीत, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | 20 हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनने अटक (Pune ACB Trap) केलेल्या पोलिस उपनिरीक्षकावर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे (PSI Suspended). याबाबतचे आदेश अप्पर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale) यांनी दिले आहे. (Pune Crime News)

 

शशिकांत नारायण पवार (Shashikant Narayan Pawar) असे निलंबीत करण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, उपनिरीक्षक शशिकांत पवार हे सिंहगड रोड पोलिस ठाण्यात (Sinhagad Raod Police Station) परिविक्षाधीन पोलिस उप निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे दि. 26 डिसेंबर 2022 रोजी एक तक्रारअर्ज तपासासाठी देण्यात आला होता. त्या अर्जाचा तपास केल्यानंतर तक्रारदाराकडे उपनिरीक्षक पवार यांनी 20 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली (Pune Bribe Case). अ‍ॅन्टी करप्शनकडून प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. (Pune Crime News)

पोलिस उपनिरीक्षक हे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला. दरम्यान, उपनिरीक्षक पवार यांना दि. 5 एप्रिल 2023 रोजी रात्री सव्वा आकरा वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली.
त्यानंतर पवार यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. 10 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिलेला आहे.
पवार यांनी पोलिस दलाची (Pune Police) प्रतिमा मलिन केली तसेच
अधिकाराचा गैरवापर केला म्हणून उपनिरीक्षक पवार यांना पोलिस दलातून तात्काळ निलंबीत करण्यात आले आहे.

 

Web Title :  Pune Crime News | Additional CP Rajendra Dahale Suspended
Police Sub Inspector Shashikant Narayan Pawar In bribery case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा