
Pune Crime News | बापापाठोपाठ मुलगाही खंडणी मागू लागला; सराईत गुन्हेगार फिरोज खानच्या मुलावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | बाप तुरुंगात असताना आता त्याचा मुलगा खंडणी (Extortion Case) मागत फिरु लागला असून लष्कर पोलिसांनी (Pune Police) त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
अनस फिरोज खान Anas Feroze Khan (रा. चुडामन तालीम, भवानी पेठ) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी रुपेश सोपानराव डाके (वय ५१, रा. बाबाजान चौक, कॅम्प) यांनी फिर्याद (गु. रजि. नं. १८७/२३) दिली आहे. हा प्रकार बाबाजान चौकाजवळील राजे चायनिज फास्ट फुडमध्ये (Raje Chinese Fast Food Babajan Chowk) ३० जुलै व १ ऑगस्ट रोजी रात्री दहा ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश डाके यांचे राजे चायनिज फास्ट फुड आहे. अनस याचे वडिल फिरोज खान (Feroze Khan) हा सराईत गुन्हेगार (Criminal On Pune Police Records) आहे. काही दिवसांपूर्वी तो तुरुंगातून जामिनावर सुटून आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा एकला खंडणी (Ransom Case) मागून घरात शिरुन मारहाण (Beating) केली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली आहे. (Pune Crime News)
अनस खान हा ३० जुलै रोजी डाके यांच्या हॉटेलवर आला. त्याने रोज शंभर रुपये खंडणी देण्याची मागणी केली.
त्याला फिर्यादी यांनी नकार दिला.
यावर त्याने “आब्बा जेलसे बाहेर आने के बाद हररोज पाचसौ रुपये लेके जाऊंगा,” असे म्हणून निघून गेला.
यानंतर दुसर्या दिवशी तो पुन्हा आला. तो फिर्यादीला म्हणाला की, “चाचा तुम खयाल रखो.
तुमने मुझे परसो पैसे नही दिये, तुमने गलत काम किया, मै तुमको रुपेश नही, रुपेश चाचा बोला हू,
अभी मै तुमको दिखाता हू” असे म्हणून फिर्यादीकडे पैशांची मागणी करुन शिवीगाळ करुन दमदाटी केली.
लष्कर पोलिसांनी (Lashkar Police Station) खंडणीचा गुन्हा दाखल केला असून
पोलीस उपनिरीक्षक गायकवाड (PSI Gaikwad) तपास करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Crime News | बारामतीतील व्यावसायिकाला पुण्यात मागितली १० लाखांची खंडणी;
कारला लावली होती खंडणी मागणारी चिठ्ठी