Pune Crime News | चेष्टा मस्करीत गुदद्वाराला पाईप लावून गुदद्वारातून शरीरात भरली हवा, अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू; हडपसर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | फूड प्रोसेसिंग कंपनीत काम करणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या गुदद्वाराला (Anus) एअर कॉम्प्रेसरचा (Air Compressor) पाईप लावून त्याच्या अंगात हवा भरली. या अघोरी कृत्यामुळे अल्पवयीन मुलाचा जागेवर मृत्यू (Child Death) झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.4) सकाळी साडेदहा ते अकरा या दरम्यान हडपसर इंडस्ट्रीयल एरिया इस्टेट येथील पुना फ्लोअर अँड फुड्स (Pune Flour and Foods) या कंपनीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) एकाला अटक केली आहे. (Pune Crime News)

मोतीलाल साहू (वय-16) असे मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी धीरजसिंग गोपालसिंग गौड (वय-21 रा.हडपसर इंडस्ट्रीयल एरिया इस्टेट, हडपसर) याच्यावर आयपीसी 304 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. याबाबत शंकरदिन रामदिन साहू (वय 34, रा. मूळ बडागाव, मध्य प्रदेश) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी पुना प्लोअर अँड फुड्स या कंपनी काम करतात.
सोमवारी सकाळी आरोपी, फिर्यादी व त्यांचा मयत भाचा कंपनीच्या तिसऱ्या मजल्यावर काम करत होते.
त्यावेळी चेष्टा मस्करीत आरोपीने कंपनीत साफसफाईसाठी वापरत असलेला हवेचा एअर कॉम्प्रेसरचा पाईप फिर्यादी
यांचा भाचा मोतीलाल याच्या गुदद्वाराला लावला. मोतीलाल याच्या पोटात भरली गेल्याने शरिरात गंभीर दुखापत
होऊन मोतीलाल याचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कवळे (PSI Kavale)करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pankaja Munde-Dhananjay Munde | मुंडे भाऊ-बहिण एकाच व्यासपीठावर, पंकजा यांच्या मिश्किल टिप्पणीला उपस्थितांची दाद, ”आज पारा जरा जास्तच…”

Pune Pimpri Chinchwad Crime News | क्रेडीटवर हायड्रोलिक मशीन घेऊन पावणे सहा कोटींची फसवणूक, महाळुंगे परिसरातील प्रकार

Mrunal Thakur Airport Look | एअरपोर्टवर ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसली मृणाल ठाकूर, पाहा व्हायरल कॅज्यूअल लूक…

Shahrukh Khan Spotted At Airport | एअरपोर्टवर किलर लूकमध्ये दिसला शाहरूख खान, एका झलकसाठी चाहत्यांना लागलं वेड…