पुणे तिथं काय उणे ! 83 वर्षाचं म्हातारं अन् 70 व 65 वर्षांची म्हातारी चक्क करत होते गांजाची तस्करी; पोलिसांच्या छाप्यात 4 किलो गांजा जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – वय ८३, ७० आणि ६५ वर्षाच्या तिघा ज्येष्ठांवर कोणाचा संशयही येणार नाही. पण ते तिघे चक्क गांजाची तस्करी smuggling ganja करीत असल्याचे आढळून आले. त्यांच्या ताब्यातून १ लाख ३० हजार ५५ रुपये किंमतीचा ४ किलो ६०३ ग्रॅम गांजा smuggling ganja हस्तगत करण्यात आला आहे.

Aadhaar कार्ड अन् ड्रायव्हिंग लायसन्स लिंक करा, अन्यथा….

याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार प्रदीप छबु शेलार यांनी भोसरी एमआयडीची पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
त्यावरुन पोलिसानी माणकाबाई शहाजी वाघमारे (वय ६५, रा. आंबेडकर झोपडपट्टी, लांडेवाडी, भोसरी),
मामू ऊर्फ रऊफ खान रमजान खान (वय ८३, रा. विठ्ठलनगर झोपडपट्टी, लांडेवाडी, भोसरी)
आणि सावित्रीबाई युवराज गायकवाड (वय ७०, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी एमआयडीसी, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

वाळूचा ट्रक अडवल्याने महिला तलाठीला मारहाण; भाजप नगरसेवकाविरोधात FIR दाखल

अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी दुपारी लांडेवाडीतील आंबेडकरनगर झोपडपट्टी,
विठ्ठलनगर झोपडपट्टी, बालाजीनगर झोपडपट्टी या ठिकाणी छापा घालून
या तिघांकडून ४ किलो ६०३ ग्रॅम गांजा Cannabis हस्तगत केला आहे.
या ज्येष्ठांवर कोणाचा संशय येणार नाही, याचा गैरफायदा घेऊन ते गांजाची विक्री करीत होते. सहायक पोलीस निरीक्षक पांचाळ अधिक तपास करीत आहेत.

 

READ ALSO THIS :

Lockdown in Pune : …म्हणून पुण्याची तिसर्‍या स्तरात घसरण

अभिनेते दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात !

 

वाळूचा ट्रक अडवल्याने महिला तलाठीला मारहाण; भाजप नगरसेवकाविरोधात FIR दाखल
नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – वाळूचा ट्रक sand truck अडवल्याने भाजप नगरसेवकाने महिला तलाठीला शिवीगाळ करत मारहाण केली आहे. नंदूरबार जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी संबधित नगरसेवकांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपी नगरसेवकाला अटक करावी या मागणीसाठी महिला तलाठ्यासह अन्य अधिकारी पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते.

या प्रकरणी तलाठी निशा पावरा यांनी नंदूरबार शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार नंदूरबारमधील भाजप नगरसेवक गौरव चौधरी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांच्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाकडे गुजरातहून महाराष्ट्रात वाळू वाहतूक करण्यासंबंधिचा परवाना नव्हता.
त्यामुळे तलाठी निशा पावरा यांनी वाळूचा ट्रक दोन तास अडवला होता.
दरम्यान चालकाने वाळूचा ट्रक sand truck पळवून नेण्याचाही प्रयत्न केला.
त्यामुळे तलाठी यांनी आपल्या अन्य दोन सहकारी महिलांसोबत पाठलाग करून हा ट्रक पकडला. घटनेची माहिती मिळताच ट्रकचे मालक नगरसेवक गौरव चौधरी घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी महिला तलाठ्यांसोबत वाद घालायला सुरुवात केली.
त्यानंतर चौधरी यांनी तलाठी निशा पावरा यांना मारहाण केली.
या घटनेनंतर तलाठी आणि अन्य अधिकाऱ्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात जाऊन नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.