Pune Crime News | भाई न बोलल्याने तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन खूनाचा प्रयत्न; नवी खडकीतील घटना

पुणे : Pune Crime News | रस्त्यावरुन जाताना ओळख दाखविताना भाई न म्हटल्याने गुंडांच्या टोळक्याने एका तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. (Pune Crime News)

याप्रकरणी संतोष साळवे Santosh Salve (वय ३६, रा. यशवंतनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२/२३) दिली आहे. त्यानुवार पोलिसांनी प्रफुल्ल ऊर्फ कान्या सोनवणे Prafulla aka Kanya Sonwane (वय ३०, रा. नवी खडकी), संकेत मारे ऊर्फ मेड्या Sanket Mare aka Medya (रा. यशवंतनगर, येरवडा) आणि सोनु मारे (Sonu Mare) या तिघांना अटक (Arrest) केली आहे. त्यांच्यासह महेश सुरेश पवार यांच्या अशा चौघांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार नवी खडकीतील शिवाजी पुतळा चौक येथे ४ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे जीममधून व्यायाम करुन दुचाकीवरुन घरी जात होते.
यावेळी चौकात त्यांच्या ओळखीचे आरोपी थांबले होते. तेव्हा त्याने सोनवणे याला काय पप्या काय चालले आहे,
असे विचारले. तेव्हा संकेत याने फिर्यादी याला थांबवून काय तुला लय माज आला आहे का तुला भाई बोलता
येत नाही का तू लय मोठा भाई झाला का असे बोलून शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली.
संकेत याने फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण (Beating) करुन गंभीर जखमी केले.
त्याचा मोबाईल फोडला. इतर लोक भांडणे सोडविण्यासाठी येत असताना त्यांनी हवेत लोखंडी रॉड फिरवून लोकांना तुम्ही इथे थांबू नका याला आम्ही जिवंत सोडणार नाही, असे म्हणून दहशत निर्माण केली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शेलार (Sub-Inspector of Police Shelar) तपास करीत आहेत.

Web Title :-Pune Crime News | An attempt to kill a young man by hitting an iron rod on his head because his brother did not speak; Incident in Navi Khadki

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पोलीस शिपायाचा परस्पर कारनामा; लोहमार्ग उपअधीक्षकाच्या नावाने परस्पर मागितले सीसीटीव्ही फुटेज

Protein Powder Desi Tip | बाजारात कशाला जायचे जर घरातच बनवता येते प्रोटीन पावडर? जाणून घ्या सेवनाचा Right Time